आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानीने धोनी-अभिषेकबरोबर पाहिली मॅच, रंगले SELFIE सेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमएस धोनी आणि नीता अंबानी सेल्फी घेताना. - Divya Marathi
एमएस धोनी आणि नीता अंबानी सेल्फी घेताना.
चेन्नई- आयएसएलमध्ये चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील सामना पाहण्यासाठी बिझनेसमन मुकेश अंबानीची पत्नी नीता अंबानीही पोहोचली. बऱ्याच दिवसांपासून फुटबॉलला प्रमोट करत असलेली नीता येथे क्रिकेटर एमएस धोनीबरोबर सेल्फी काढताना दिसून आली. यांच्या शिवाय येथे बॉलीवुड स्टार अभिषेक बच्चनदेखील उपस्थित होते. धोनी आणि अभिषेक आयएसएलच्या टीम चेन्नईयन एफसीचे को-ऑनर आहेत.
चेन्नईने दिल्लीला चारली धूळ
भारतीय फॉरवर्ड जेजे लालपेखलुआच्या शानदार दोन गोल्सच्या बळावर चेन्नईयन एफसीने इंडियन सुपर लीग 2015 च्या लीग मॅचमध्ये दिल्ली डायनामोजला 4-0 ने हरवले. दिल्लीसाठी जेजेने दोन गोल केले तर कोलंबियाच्या मंदोजा वॅलेंशिया आणि ब्राझिली मिडफील्डर ब्रूनो पेलिस्सरी यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला. चेन्नईने आपल्या 12व्या सामन्यात पाचवा विजय नोंदविल्यानंतर 16 प्वाइंट्ससह गुणतीलीकेत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाह, एमएस धोनी, नीता अंबानी आणि अभिषेक बच्चन यांचे सामन्यातील खास PHOTOs...