आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अायएसएल : अल्फाराेचा डबल धमाका; युनायटेडची गाेव्यावर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - सलामीच्या विजयाने अात्मविश्वास द्विगुणित झालेल्या नाॅर्थ-ईस्ट युनायटेडने तिसऱ्या सत्राच्या इंडियन सुपर लीग (अायएसएल) फुटबाॅल स्पर्धेतील अापला दुसरा सामना जिंकला. या टीमने मंगळवारी एसी गाेव्याला २-० अशा फरकाने धूळ चारली. बाॅलीवूडचा अभिनेता जाॅन अब्राहमच्या युनायटेडने लीगमध्ये दुसऱ्या विजयाची नाेंद केली. अाता युनायटेडचा लीगमधील तिसरा सामना शुक्रवारी मुंबई सिटीविरुद्ध रंगणार अाहे. तसेच गाेवा टीमला शनिवारी पुणे सिटीच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. हे दाेन्ही संघ लीगमध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक अाहेत. या दाेन्ही टीमचा सलामीला पराभव झाला.

उरुग्वेचा स्टार स्ट्रायकर एमिलिअानाे अल्फाराेने (२०, ६२ मि.) गाेलचा डबल धमाका उडवून युनायटेडला सामन्यात एकतर्फी विजय मिळवून दिला. गाेव्याचे स्टार खेळाडू सपशेल अपयशी ठरले. या संघाचा स्पर्धेतील अापल्या सलामीला विजय मिळवण्याचा प्रयत्न अपुरा ठरला.
बातम्या आणखी आहेत...