फ्लॉरेन्स | हे छायाचित्र शनिवारी खेळल्या गेलेल्या ‘कॅल्सियो स्टोरियो फियारेंटियो’ म्हणजेच ऐतिहासिक फुटबॉल’च्या उपांत्य सामन्यातील आहे. येत्या २४ जून रोजी या स्पर्धेची फायनल रंगणार आहे. इटलीमध्ये सोळाव्या शतकातील हा खेळ दरवर्षी उन्हाळ्यात खेळला जातो. यामध्ये कुस्ती, फुटबॉल आणि रग्बीसारख्या तीन खेळांचा समावेश आहे. म्हणजेच एका खेळात तीन क्रीडा प्रकार खेळले जातात.
विजेत्याकडून सर्वाधिक गुण संपादन करणाऱ्या खेळाडूला बक्षीस म्हणून मिळते गाय
या कलरफुल आणि हिंसक खेळात सेंटा क्रोस (निळा), सेंटा मारिया नोवेला (लाल), सेंटो स्पिरिटो (पांढरा) आणि सेन जियोवानी (हिरवा) हे चार संघ सहभागी होतात. प्रत्येक टीममध्ये २७ खेळाडू असतात. हे खेळाडू हात वा पायाने नाही, तर दोन्हींच्या मदतीने चेंडूला नेटमध्ये पाठवतात. विजेत्या टीमकडून सर्वाधिक गुण संपादन करणाऱ्यास बक्षिसाच्या स्वरूपात गाय दिली जाते.
डोक्यावर किक मारण्यास मनाई
प्रतिस्पर्ध्याकडून चेंडू हिसकवण्यासाठी खेळाडू हेड बटिंग, पंचिंग, चोकिंग करू शकतो. मात्र, पायाने डोक्याला किक मारण्यास मनाई आहे. असे करणाऱ्यास मैदानाबाहेर केले जाते.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, या खेळाचे आणखी काही फोटोज...