न्यूयॉर्क- सेरेना विल्यम्स आणि तिची मोठी बहीण व्हीनस विल्यम्सने यूएस ओपन टेनिस टोर्नामेंटच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक घेतली आहे. आता या दोघी बहिणी अंतिम चारमध्ये जागा मिळवण्यासाठी एकमेकांच्या विरोधात मैदानावर उतरणार आहेत. तर दुसरीकडे पुरूषांमधून नोवाक जोकोविचनेदेखील 26 व्या ग्रॅन्ड स्लॅम क्वार्टर फायनलमध्ये धडक घेतली आहे.
व्हीनसशी होणार महा-मुकाबला
जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स आता थेट तिचीच मोठी बहीण व्हीनस विरूद्ध टोर्णामेंटच्या क्वार्टर फायनलमध्ये उतरणार आहे. व्हीनसने आतापर्यंत दोनवेळा यूएस ओपन चॅम्पिअनशीप जिंकली आहे. होणार्या या सामन्याकडे सर्वच टेनिस जगताचे लक्ष लागले आहे. या सामन्याकडे टोर्नामेंटमधील महा मुकाबला म्हणूनही पाहिले जात आहे. सेरेनाने महिला सिंगल्सच्या चौथ्या राउंडमध्ये हमवतन आणि 19 व्या सीड मॅडिसन कीला सलग सेटमध्ये 6-3 6-3 ने तर व्हीनसने एस्टोनियाच्या एनेट काँटावेट वर 6-2 6-1ने विजय मिळवला आहे.
26 व्या वेळी असतील एकमेकींच्या समोर
21वेळची ग्रँड स्लेम चँम्पियन सेरेना एकाच वर्षात चारच्या चारही स्लॅम जिंकणारी जगातील चौथी महिला बनण्याच्या शर्यतीत आहे. घरच्या मैदानावर प्रबळ दावेदार असलेल्या सेरेना आणि तिची बहीण व्हीनस करियरमध्ये 26 व्या वेळी एक-मेकींच्य विरूद्ध खेळतील.
जोकोविचदेखील क्वार्टर फायनलमध्ये
जगतीक पुरूष क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू जोकोविच याने पुरूष एकेरीत चौथ्या फेरीत स्पेनच्या रॉबर्टो बॉटिस्टा अॅगूटला चार सेटमध्ये 6-3 4-6 6-4 6-3ने हरवत 26 व्या ग्रँड स्लॅम क्वार्टर फायनलमध्ये धडक घेतली. जोकोविचच्या आधी ही कामगिरी रॉजर फेडरर (36) जिमी कॉर्स (27) यांनी केली होती.