आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामश्री करंडक महिलांच्या जागतिक टेनिस स्पर्धेत झीलचा कनिकावर विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : जामश्री करंडक महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत झील देसाईने भारताच्याच कनिका वैद्यला ६-३, ७-५ असे नमवले. सोमवारपासून मुख्य फेरीस सुरुवात झाली. झीलविरुद्ध चुरशीचा सामन्यात कनिकाने बहारदार खेळीचे प्रदर्शन करीत विजय मिळवला.
दुहेरीच्या आणखी एका चुरशीच्या सामन्यात अॅनास्तेसिया प्रिबीलोबा (रशिया) व ओला झेकरी (इजिप्त) यांची भारताच्या साई चामार्थी व अमित मुखर्जी या जोडीला नमवताना दमछाक झाली. दोन तास चाललेल्या या सामन्यात अॅनास्तेसिया व ओला या जोडीने सुपर टायब्रेकरमध्ये भारताच्या जोडीला ६-२, ६-७ असे नमवले.
अन्य निकाल : एकेरी : स्नेहा रेड्डी वि. वि. मलायका फर्नांडिस ६-१, ६-१. निधी चिलुमुला वि. वि. सोहा सादिक ६-४, ६-३, रम्या नटराजन वि. वि. अनुशा कोंडावेट्टी ६-१, ६-२. किरा श्रॉफ वि. वि. आरथी मुनियान ६-०, ६-०. साई चामार्थी वि. वि. दक्षता पटेल ६-३, ७-५.
बातम्या आणखी आहेत...