आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपान ओपन बॅडमिंटन : के. श्रीकांतची पी. कश्यपवर मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - आठवा मानांकित किदाम्बी श्रीकांत, अजय जयराम आणि एच. एस. प्रणय यांनी बुधवारी आपापले सामने जिंकताना जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. श्रीकांतपुढे पात्रता फेरीतून मुख्य फेरीत आलेल्या परुपल्ली कश्यपचे आव्हान होते. श्रीकांतने पहिला गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करताना एक तास २ मिनिटांत सामना १४-२१, २१-१४, २३-२१ ने जिंकला. दुखापतीतून सावरल्यानंतर कश्यपचा हा पहिला सामना होता. आता क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीकांतपुढे भारताच्या अजय जयरामचे आव्हान असेल. जयरामने इंडोनेशियाच्या सोनी दवी कुनकोरोला ४६ मिनिटांत २१-१९, २१-२१ ने हरवले. प्रणयने मलेशियाच्या इस्कंदर जुल्करनॅन जैनुद्दीनला एक तास ९ मिनिटांत २३-२१, १९-२१, २१-१८ ने मात दिली. प्रणयचा पुढचा सामना दुसरा मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसनशी होईल. इतर
एका सामन्यात भारताच्या बी. साई प्रणीतने हाँगकाँगच्या एन. लोंग एंगसला ५५ मिनिटांत ९-२१, २३-२१, २१-१० ने मात दिली.
बातम्या आणखी आहेत...