आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपान अाेपन बॅडमिंटन: पी.कश्यप मुख्य फेरीत; अाता श्रीकांतचे अाव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाेकियाे - राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन पी.कश्यपने मंगळवारी जपान सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत धडक मारली. अाता त्याला पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात अापल्या देशाच्या के. श्रीकांतच्या तगड्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. त्याने पात्रता फेरीत शानदार दाेन विजयांची नाेंद करून स्पर्धेतील अापला सहभाग निश्चित केला. मुख्य फेरीला बुधवारपासून सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेत भारताचे युवा खेळाडू नशीब अाजमावणार अाहेत. यात श्रीकांतसह कश्यप, अजय जयराम, बी. साई प्रणीत अाणि एच.एस.प्रणयचा समावेश अाहे. भारताचे हे सर्व खेळाडू अाजपासून स्पर्धेतील किताबाच्या अापल्या माेहिमेला सुरुवात करतील.

भारताचा युवा बॅडमिंटनपटू पी.कश्यपने पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात अाॅस्ट्रियाच्या डेव्हिडविरुद्ध शर्थीची झंुज दिली. दरम्यान, गंभीर दुखापतीमुळे डेव्हिडने सामन्यातून माघार घेतली. परिणामी कश्यपला विजयी घाेषित करण्यात अाले. त्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात डेन्मार्कच्या अांद्रेस अॅटाेन्सनला पराभूत केले. त्याने २१-१८, २१-१२ अशा फरकाने सामन्यात शानदार विजयाची नाेंद केली.यासह त्याने मुख्य फेरी गाठली.
तन्वीचे स्वप्न भंगले
युवा बॅडमिंटनपटू तन्वी लाडचे या सुपर सिरीजच्या महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न भंगले. तिला पात्रता फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. यजमान जपानच्या चिसाताे हाेशीने अापल्या घरच्या मैदानावर सामन्यात तन्वीला पराभूत केले. तिने १९-२१, २१-१८, २१-९ अशा फरकाने विजय संपादन करून मुख्य फेरी गाठली.
बातम्या आणखी आहेत...