आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डी: जयपूरचा दुसरा विजय; पुणेरी पलटणवर मात; पाटणाविरुद्ध बंगाल वॉरियर्स लढत ड्रॉ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघाला प्रो- कबड्डी लीगमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद करता आली. या संघाने लीगमधील आपल्या सातव्या सामन्यात पुणेरी पलटणवर मात केली. नवनीत गौतमच्या नेतृत्वाखाली जयपूर संघाने ३५-२९ अशा फरकाने सामना जिंकला. या विजयाच्या बळावर गतविजेत्या जयपूर संघाला गुणतालिकेत सहाव्या स्थानावर धडक मारता आली. आता या संघाचे सात सामन्यांत दोन विजयांसह एकूण १३ गुण झाले आहेत.

दुसरीकडे पुणेरी पलटणला सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे या टीमची गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरण झाली. या संघाचे सात सामन्यांत एका विजयासह एकूण १० गुण आहेत.
सोनू नारवाल (८), राजेश नारवाल (६) आणि जसवीरसिंग (६) यांनी सुरेख खेळीच्या बळावर संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे जयपूरला पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर येता ओले. याशिवाय कुलदीपसिंग (४), सी. अरुण (४) यांनीही पुणेरी पलटणविरुद्ध विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळाडूंमुळे जयपूरला पाटणाच्या मैदानावर दमदार सुरुवात करता आली. दरम्यान, पराभवाची मालिका खंडित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पुणेरी पलटणने चुरशीची खेळी केली. मात्र, या टीमला जयपूरच्या चढाईपटूंना राेखण्यात यश मिळाले नाही. त्यामुळे पुणेरी पलटणला सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. लढतीत पुणेरी पलटणचा प्रवीण निवाले सर्वोत्तम चढाईपटू ठरला. कुलदीप सिंगने सर्वोत्तम बचावपटूचा पुरस्कार मिळवला. जयपूरचा जसवीर उत्कृष्ट खेळाडू ठरला.

नीलेश शिंदे चमकला
रविवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत पाटणा पायरेटसविरुद्ध बंगाल वॉरियर्स यांच्यातील रोमांचक लढत २०-२० गुणांनी बरोबरीत राहिली. पाटणाचा नीलेश शिंदे बचावपटू ठरला. पाटणाचे ६ लढतींत आता १७ गुण झाले आहेत. बंगाल ८ गुणांसह तळाला आहे.
३५-२९- ने विजय
२०- गुण चढाईपटूंचे
१०- गुणांची पकडीतून कमाई
१३- गुणांसह सहाव्या स्थानी
बातम्या आणखी आहेत...