आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूर पँथर्सकडून पुणेरी पलटण पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जबरदस्त फाॅर्मात असलेला गतविजेता जयपूर पिंक पँथर्स संघ विजयी ट्रॅकवर परतला अाहे. सिनेअभिनेता अभिषेक बच्चनच्या जयपूर संघाने दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये पाचव्या विजयाची नाेंद केली. या संघाने मंगळवारी लीगमध्ये पुणेरी पलटणचा पराभव केला. या टीमने ३१-१८ अशा फरकाने सामना जिंकला. जयपूरचा हा सलग दुसरा विजय ठरला. अाता गुरुवारी गत चॅम्पियन जयपूरच्या टीमला बंगळुरू बुल्सच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल.
दिल्लीने तेलुगूला बराेबरीत राेखले : रवींदर पहलच्या नेतृत्वात मंगळवारी दबंग दिल्ली संघाने रंगतदार सामन्यात तेलुगू टायटन्स टीमला बराेबरीत राेखले. विजयासाठी शर्थीची झंुज देणाऱ्या या दाेन्ही टीममधील हा सामना ४५-४५ ने बराेबरीत सुटला. या वेळी काशीलिंग अडकने सामन्यात चुरशीची खेळी करून सर्वाधिक २४ गुणांची कमाई केली. त्यामुळे दबंग दिल्लीला सामन्यातील अापला पराभव टाळता अाला. तसेच राेहित कुमार (७) व रविंदरने (४) सुरेख खेळी केली. अाता या टीमचा सामना शुक्रवारी बंगळुरूशी हाेईल.

बंगळुरूसमाेर अाज यू मुंबा
बंगळुरू बुल्सला बुधवारी यू मुंबाच्या तगड्या अाव्हानाला सामाेरे जावे लागणार अाहे. दहाव्या विजयाच्या इराद्याने मुंबा टीम मैदानावर उतरेल.