आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

३४ वर्षांपासून फ्रान्सचा खेळाडू पियरे कोमात; पत्नीने सोडली नाही साथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पियरेची पत्नी बर्नाडेट, १९७२ मध्ये मुलासह पियरे आणि बर्नाडेट. - Divya Marathi
पियरेची पत्नी बर्नाडेट, १९७२ मध्ये मुलासह पियरे आणि बर्नाडेट.
पॅरिस - १७ मार्च १९८२, ही ती तारीख आहे, ज्या दिवशी लियोन हॉस्पिटलमध्ये ३४ वर्षीय फ्रान्सचा फुटबॉलपटू जीन पियरेच्या गुडघ्यावर सामान्य शस्त्रक्रिया होणार होती. यासाठी त्याला अॅनेस्थेटिक (गुंगीचे औषध) दिले गेले. या औषधीचा परिणाम काही तासांत संपतो, असे मानले जाते. मात्र, असे झाले नाही. तो गेल्या ३४ वर्षांपासून कोमात आहे. अशाच स्थिती अर्धे आयुष्य जगणारी त्याची पत्नी बर्नाडेट अजूनही पियरेची जातीने काळजी घेते. याच महिन्यात वयाची ६८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पियरेसाठी तिचे प्रेम आजही पूर्वीसारखेच आहे. द. फ्रान्समधील कॅसरगस स्थित आपल्या घराला बर्नाडेटने प्रेमाने "द हाऊस ऑफ द ब्यूटिफूल स्लिपिंग अॅथलिट' असे नाव दिले आहे. आफ्रिकन वंशाच्या पियरेने १९७२-७६ या काळात २२ सामन्यांत फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले. कधी कधी डोळ्याच्या पापण्याही हलवतो. या तीन दशकांत बर्नाडेटने कधीच खूप वेळ त्याची साथ सोडली नाही.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, हॉस्पिटलच्या चुकीचा फटका.... तर चमत्कार शक्य
बातम्या आणखी आहेत...