आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक मानांकन स्पर्धा: दमदार कामगिरीसह झील देसाईची उपांत्य फेरीत धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अहमदाबादच्या झील देसाईने अमेरिकेच्या चॅनेली न्गुयेनवर मात करत जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत झील वगळता एकेरीत व दुहेरीत विदेशी खेळाडूंनी बाजी मारली. झीलने पहिला सेट ६-१ असा सहज जिंकला. नंतर दुसऱ्या सेटमध्ये चॅनेलीने पिछाडीवरून शानदार खेळाचे प्रदर्शन करत ५-५ अशी बरोबरी साधली. ०-३० अशी गुणस्थिती असताना अचानक चॅनेलीच्या पायाचे स्नायू दुखावल्यामुळे तिने सामना सोडून दिला. दुसऱ्या सामन्यात तैपेईच्या चिह यू हसूने चेन्नईच्या स्नेहा रेड्डीस ६-३ असे नमविले. या सामन्यात तब्येत बिघडल्याने पहिल्या सेटनंतर स्नेहाने सामना सोडून दिला.

बातम्या आणखी आहेत...