आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यो विल्फ्रेंड त्सोगा तिसऱ्यांदा चॅम्प ; फायनलमध्ये सिमोनचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेट्ज- तिसऱ्या मानांकित ज्यो विल्फ्रेंड त्सोगाने रविवारी मेट्ज ओपन टेनिस स्पर्धेचा किताब पटकावला. अशा प्रकारे त्याने तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.
फ्रान्सच्या त्सोंगाने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये आपल्याच देशाच्या जाइल्स सिमोनचा पराभव केला. त्याने ७-६, १-६, ६-२ अशा फरकाने रोमहर्षक विजयाची नोद केली. त्यामुळे त्याला २०१३ मध्ये याच स्पर्धेत सिमोनकडून मिळालेल्या पराभवाचा वचपाही काढता आला. त्याने आपल्या करिअरमध्ये १२ वा एटीपी किताब मिळवला.

युकीला उपविजेतेपद
भारताचा युवा खेळाडू युकी भांबरीला तैवान चॅलेंजर टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याला रविवारी एकेरीच्या फायनलमध्ये काेरियाच्या ह्याेन चुंगने ७-५, ६-४ ने पराभूत केले.