आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युनियर अाशिया चषक हाॅकी: भारतीय हॉकी संघाचा ओमानवर ९-० ने विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुअानतान- हरजित सिंगच्या नेतृत्वाखाली जबरदस्त फाॅर्मात असलेल्या भारतीय युवा संघाने गुरुवारी अाेमानचा ९-० अशा फरकाने धुव्वा उडवला. या धडाकेबाज विजयासह भारतीय हाॅकी संघाने ८ व्या ज्युनियर अाशिया चषक हाॅकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चाैथा विजय ठरला. गत सामन्यात भारताने बलाढ्य चीनला धूळ चारली हाेती. हरमनप्रीत सिंगने (७, १२, ५० मि.) शानदार गाेल करून भारताला विजय मिळवून दिले. त्यापाठाेपाठ अरमान कुरेशी (१० मि.), गुरजिंत (१८ मि.), सांता सिंग (२२ मि.), मनदीप सिंग (३० मि.), हरजित (४५ मि.), माेहंमद उमर (५४ मि.) यांनी भारताच्या विजयात प्रत्येकी एका गाेलचे याेगदान दिले. विजयी लय गवसलेल्या भारतीय संघाने ब गटातील अाेमानविरुद्ध दमदार सुरुवात केली.

जपानची बांगलादेशवर मात
स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात जपानने शानदार एकतर्फी विजयाची नाेंद केली. या टीमने अंतिम अाठमध्ये बांगलादेशवर ३-० अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला.

हरमनचे तीन गाेल
फाॅॅर्मात असलेल्या हरमनप्रीत सिंगने सामन्यात शानदार तीन गाेलची नाेंद केली. त्यामुळे टीमला सातव्या मिनिटाला सामन्यात गाेलचे खाते उघडता अाले. त्यानंतर १२ व्या मिनिटाला त्याने गाेल करून भारताला पाच मिनिटांच्या फरकात २-० ने अाघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये ५० व्या मिनिटाला त्याने संघाकडून अाठवा अाणि वैयक्तिक तिसरा गाेल केला.