आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडा आेपन बॅडमिंटन स्पर्धा : ज्वाला-अश्विनीची आगेकूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलागरी - भारताचा अजय जयराम, ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पाेनप्पाने कॅनडा आेपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. बी. साई प्रणीतने पुरुष एकेरीच्या अंतिम आठमधील आपला प्रवेश निश्चित केला. त्यापाठाेपाठ सिक्की आणि प्रज्ञा गद्रेनेही यशस्वीपणे महिला दुहेरीची क्वार्टर फायनल गाठली.

राष्ट्रकुल स्पर्धेतील राैप्यपदक विजेत्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनीने महिला दुहेरीत राेमहर्षक विजयाची नोंद केली. या तिसर्‍या मानांकित जाेडीने लढतीत हाॅलंडच्या समंथा बार्निग आणि इरिसचा पराभव केला. ज्वाला-अश्विनीने १६-२१, २१-१६, २१-१७ अशा फरकाने विजय मिळवला. यासह या जाेडीने पुढची फेरी गाठली. मात्र, यासाठी तिसर्‍या मानांकित जाेडीला ४७ मिनिटे झंुज द्यावी लागली. मात्र, सरस खेळी करताना ज्वाला आणि अश्विनीने शानदार विजय साकारला. हाॅलंडच्या बिगरमानांकित जाेडीने पहिल्या गेममध्ये बाजी मारून लढतीमध्ये आघाडी मिळवली. मात्र, या जाेडीला हे आव्हान फार काळ टिकवून ठेवता आले नाही. त्यानंतर तिसर्‍या मानांकित ज्वाला-अश्विनीने दमदार पुनरागमन करून लढतीमध्ये बराेबरी साधली.

या जाेडीने दुसरा गेम जिंकला. त्यानंतर तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये बाजी मारून या जाेडीने सामना जिंकला. आता ज्वाला-अश्विनीला आता अंतिम आठमध्ये हाँगकाँगच्या चेन काका आणि युईन सिन यिंगच्या खडतर आव्हानाला सामाेरे जावे लागेल.

ज्वाला-अश्विनीची प्रगती
ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा या जोडीने यूएस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत शानदार प्रदर्शनाच्या बळावर गुरुवारी जाहीर झालेल्या बॅडमिंटन क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती केली. यासह त्यांनी आपल्या सर्वश्रेष्ठ क्रमवारीत स्थानाची पुन्हा बरोबरी केली. ज्वाला-अश्विनीने यूएस ओपनच्या सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती, त्यामुळे महिला दुहेरीच्या क्रमवारीत १३ वे स्थान त्यांनी गाठले. या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये प्रवेश केलेल्या मनू अत्री व बी. सुमीत रेड्डी जोडीने दोन स्थानांनी उडी घेत २४ वे स्थान गाठले. एकेरीत सायना नेहवाल दुसर्‍या, पी.व्ही. सिंधू चौदाव्या, के. श्रीकांत तिसर्‍या, परुपल्ली कश्यप दहाव्या आणि एच. एस. प्रणय १२ व्या स्थानावर विराजमान आहेत.

विस्नूविरुद्ध अजय जयराम विजयी
पुरुष एकेरीत नवव्या मानांकित अजय जयरामने शानदार विजय मिळवला. त्याने बिगरमानांकित विस्नू युली प्रासेत्याेचा पराभव केला. जयरामने २१-१२, १७-२१, २१-१२ अशा फरकाने सामना जिंकला. त्याला ५३ मिनिटांची झुंज द्यावी लागली. प्रणीतने श्रीलंकेच्या निलुकाला १४-२१, २१-१५, २१-१५ ने हरवले.

सिक्की-प्रज्ञाचा विजय
महिला दुहेरीत प्रज्ञा गद्रे आणि सिक्कीने जर्मनीच्या जाेहाना गाेलित्सवेकी आणि कार्लावर मात केली. या जाेडीने २१-१५, २१-१३ ने विजय संपादन केला. त्यामुळे त्यांना पुढच्या फेरीत प्रवेश करता आला.
बातम्या आणखी आहेत...