आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडा ओपन बॅडमिंटन : ज्वाला गुट्टा-अश्विनीची सेमीफायनलमध्ये धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केलगरी, कॅनडा - राष्ट्रकुल स्पर्धा २०१० ची सुवर्ण विजेती भारताची जोडी ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पाने ५० हजार डॉलर बक्षीस असलेल्या कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

मात्र, भारताच्या बी. साईप्रणीत, अजय जयराम, प्रज्ञा गादरे आणि एन. सिक्की रेड्डीला पराभवाचा सामना करावा लागल्याने स्पर्धेबाहेर व्हावे लागले. अश्विनी- ज्वालाने हाँगकाँगच्या चान काका आणि यूएन सिन यिंग या जोडीला २७ मिनिटांत २१-१९, २१-१३ ने हरवले. तिसर्‍या मानांकित भारताच्या जोडीचा आता जपानच्या शिहो तनाका व कोहारू योनेमोटो जोडीशी सामना होईल. त्यांनी आपल्याच देशाच्या शिजुका मात्सुओ आणि मामी नैतो यांना २३-२५, २१-१५, २१-१३ ने हरवले.

आता पदकाची आशा
गेल्या आठवड्यात यूएस ओपन ग्रांप्री गोल्ड स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करून दुहेरीत आपली सर्वश्रेष्ठ १३ व्या स्थानावर ज्वाला-अश्विनीने धडक मारली होती. सध्या चांगल्या लयीत असलेल्या या भारताच्या नंबर वन महिला जोडीकडून आता पदकाची अपेक्षा आहे. या दोघींचा सामना जपानच्या शिहो तनाका व कोहारू योनेमोटो जोडीशी होईल.
बातम्या आणखी आहेत...