आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डी दिन विशेष : मराठमाेळी कब‌ड्डी ‘बाेनस’च्या प्रतीक्षेत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - पूर्वापार परंपरेचा माेठा वारसा लागलेल्या महाराष्ट्रामध्येच सध्या मराठमाेळी कबड्डी विकासाची सीमारेषेपार करण्याच्या प्रतीक्षेत अाहे. ग्लॅमर, प्रशिक्षक अाणि अत्याधुनिक साहित्याच्या अभावामुळे कबड्डीच्या प्रसाराला खीळ बसत असल्याचे चित्र सध्या राज्यात निर्माण झाले अाहे. त्यामुळे राज्यात कबड्डीला चालना मिळेनाशी झाली अाहे. ‘कबड्डी दिना’ निमित्त राज्यातील कबड्डीच्या विदारक परिस्थितीवर टाकलेला प्रकाशझाेत अधिक चिंताजनक अाहे.
प्रशिक्षकांची वानवा : राज्यात कबड्डीच्या प्रसार व प्रचारालाच मुळात खीळ बसली अाहे. तज्ज्ञ अाणि अनुभवी प्रशिक्षकांचा माेठ्या प्रमाणात अभाव अाहे. माेजकेच एनअायएससारखे प्रशिक्षक सध्या अाहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना तंत्रशुद्ध अाणि अत्याधुनिक पद्धतीच्या खेळाडूंना अत्याधुनिक शैली अात्मसात करता येत नाही. त्याचा विपरीत परिणाम खेळाडूंच्या खेळीवर पडत अाहे. तसेच या खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जाही उंचावला जात नसल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागात मैदानाचा विकास हाेईना
कबड्डीला अांतरराष्ट्रीय स्तरावर माेठा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे मातीवरच्या कबड्डीने मॅटवर स्थान निर्माण केले. मात्र, ग्रामीण भागातील खेळाडूंना नित्याच्या सरावासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या मॅटचा अभाव अाहे. तसेच यासाठीच्या अत्याधुनिक मैदानाचाही विकास झालेला नाही.

नाेकरी, ग्लॅमरच्या अभावामुळे खेळाडूंची पाठ
इतर खेळांप्रमाणे कबड्डीमध्ये नाेकरी व ग्लॅमर नाही. त्याचा फटका खेळाडूंच्या संख्येवर पडत अाहे. या ाकारणाने अनेक युवा खेळाडूंनी कबड्डी करिअर अर्ध्यावर साेडले अाहे. तसेच या खेळातील खेळाडूंसाठी प्रायाेजकत्वही मिळेनासे झाले अाहे.याबाबतीत शासनही निरुत्साही अाहे.

पुढाकारातून विकास शक्य
राज्यातील कबड्डीला चांगले दिवस येत अाहेत. चालना मिळण्यासाठी पुढाकाराची गरज अाहे. यातून कबड्डीचा विकास याेग्य प्रकारे साधला जाईल. - किशाेर पाटील, अध्यक्ष, राज्य कबड‌्डी असाेसिएशन.
बातम्या आणखी आहेत...