आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kabaddi Players Killed In Road Accident At Odisha

मिनीट्रक उलटल्याने ९ कबड्डीपटूंचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर- ओडिशाच्या सुंदरगढ जिल्ह्यात बराई येथे शनिवारी रात्री रस्ते अपघातात नऊ कबड्डीपटू ठार, तर १० जण जखमी झाले. जखमींमध्येही बहुतांश जण कबड्डीपटूच आहेत. हे खेळाडू स्थानिक स्तरावरील सामना खेळून मिनीट्रकने रात्री उशिरा परतत होते. त्या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलावरून खाली पडला. सात खेळाडूंचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघांचे रुग्णालयात निधन झाले. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.