आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-कोरिया झुंज; कबड्डी वर्ल्डकप आजपासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत - देशातील कानाकोपऱ्यात खेळल्या जाणाऱ्या कबड्डीने तब्बल नऊ वर्षांनंतर जागतिक स्तरावर पुनरागमन केले. शुक्रवारपासून कबड्डीच्या तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. अहमदाबादमध्ये अायाेजित या विश्वचषकात यजमान भारतासह १२ संघ सहभागी झाले अाहेत. त्यामुळे अाता १५ दिवस देशभरात नुसताच ‘कबड्डी, कबड्डी, कबड्डी’चा आवाज घुमणार अाहे.

यजमान भारत अाणि दक्षिण कोरिया यांच्यातील सलामी सामन्याने यंदाच्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर इराण अाणि अमेरिका हे दोन्ही संघ समाेरासमाेर असतील. इराणच्या टीमने गत स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले हाेते. तसेच अमेरिका टीम प्रथमच विश्वचषकात नशीब आजमावत अाहे.

२००४ अाणि २००७ चा विश्वचषक विजेता भारतीय संघ यंदाही किताबाचा प्रबळ दावेदार मानला जात अाहे. या दोन्ही स्पर्धेचे विश्वचषक यजमान भारताने मुंबईत अायाेजित स्पर्धेत जिंकले हाेते. यात यजमान भारताने बाजी मारली.

कबड्डी मुख्यत: दाेन पद्धतीने खेळली जाते. यात एक भारतीय अाणि दुसरी आंतरराष्ट्रीय पद्धतीने. भारतीय पद्धतीने (सर्कल फाॅरमॅट) अातापर्यंत पाच विश्वचषक कबड्डी स्पर्धा रंगल्या अाहेत. यात २०१०, २०११, २०१२, २०१३ अाणि २०१४ ची स्पर्धा झाली. तसेच इंटरनॅशनल स्टाइलमध्ये २००४ व २००७ मध्ये स्पर्धा अायाेजित करण्यात अाली हाेती. अाता अहमदाबाद येथे याच पद्धतीने तिसरा वर्ल्डकप रंगणार अाहे.

अनुपकुमार हा भारतीय संघाचे नेतृत्व करणार अाहे. त्याने गत विश्वचषक, २००६, २०१० अाणि २०१४ च्या आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय संघात प्रदीप नारवाल, सुरजित नारवाल अाणि संदीप नारवालचा समावेश अाहे.

भारतीय संघ
अनुपकुमार (कर्णधार), प्रदीप नारवाल, संदीप नारवाल, सुरजित नारवाल, सुरेंद्र नाडा, मंजित छिल्लर (उपकर्णधार), दीपक हुड्डा, जसवीरसिंग, माेहित छिल्लर, नितीन ताेमर, राहुल चाैधरी, अजय ठाकूर, किरण परमार, धर्मराज चेराथलन

अ गट : भारत, दक्षिण काेरिया, अाॅस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, अर्जेंटिना
ब गट : इराण, थायलंड, जपान, अमेरिका, पाेलंड, केनिया.

- ११ विदेशीमध्ये इराण सर्वात अनुभवी. अमेरिका यात नवीन संघ अाहे. २००० पासून खेळणाऱ्या अर्जेंटिना संघात चमत्काराची क्षमता.
- प्रत्येक गटातील दाेन अव्वल संघ उपांत्य फेरीत.
- दाेन्ही उपांत्य सामने २१ अाॅक्टाेबर राेजी,फायनल २२ अाॅक्टाेबरला.
बातम्या आणखी आहेत...