आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्वचषक कबड्डी स्पर्धा : अाॅस्ट्रेलियाला दणका; भारताचा विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - सलामीच्या पराभवातून सावरलेला यजमान भारतीय संघ शनिवारी विश्वचषक कबड्डी स्पर्धेत विजयी ट्रॅकवर परतला अाहे. यजमान संघाने स्पर्धेतील अापल्या दुसऱ्या सामन्यात अाॅस्ट्रेलियाला पराभवाचा दणका दिला. भारताने ५४-२० अशा फरकाने सामना जिंकला. भारताचा स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला.

यापूर्वी सलामीला तीन वेळच्या विश्वविजेेत्या भारताला काेरियाने धूळ चारली हाेती. अाता भारताचा तिसरा सामना मंगळवारी बांगलादेशविरुद्ध हाेणार अाहे. दुसरीकडे बांगलादेश संघाने शनिवारी विश्वचषक कबड्डी स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. या संघाने अापल्या सलामी सामन्यात इंग्लंडला धूळ चारली. बांगलादेशने ५०-१८ ने धडाकेबाज विजय मिळवला. केशव गुप्ताच्या नेतृत्वात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला.
बातम्या आणखी आहेत...