आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Kamari Super Series Badminton Tournament, Sindhu, Sameer Kashyap Parajay

काेरिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा; सिंधू, समीर उपांत्यपूर्व फेरीत; कश्यप पराभूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील राैप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू अाणि सय्यद माेदी ग्रांप्रीमधील चॅम्पियन समीर वर्माने विजयी माेहीम अबाधित ठेवताना काेरिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या दाेघांनी गुरुवारी एकेरीत अापापल्या गटातील सामने जिंकले. दुसरीकडे पी. कश्यपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले.  तसेच चिराग शेट्टी अाणि स्वस्तिकराजने पुरुष दुहेरीत शानदार विजय संपादन केला. यासह त्यांनी अागेकूच केली.  

कश्यपची झुंज अपयशी
के. श्रीकांतच्या अनुपस्थितीत पुरुष एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पी. कश्यपला पराभवाला सामाेेरे जावे लागले. त्याने विजयासाठी एक तास १७ मिनिटे दिलेली झुंज अपयशी ठरली. त्याला अव्वल मानांकित वान हाेन साेनने पराभूत केले. अव्वल मानांकित वान साेनने २१-१६, १७-२१, २१-१६  ने सामना जिंकला. पराभवामुळे कश्यपला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्याने दुसऱ्या गेममध्ये बाजी मारून लढतीत बराेबरी साधली हाेती.    

बी. साईप्रणीत पराभूत
भारताच्या बिगरमानांकित बी. साईप्रणीतलही अनपेक्षितपणे पराभवाला सामाेरे जावे लागले. त्याला सातव्या मानांकित वेई वांगने धूळ चारली. वांगने २१-१३, २६-२४ ने सामना जिंकला. यासह त्याने पुरुष एकेरीत अागेकूच केली. झुंज अपयशी ठरल्याने बी.साईप्रणीत स्पर्धेतून बाहेर झाला अाहे.  त्याने सुरुवात चांगली केली हाेती.  

समीर ४२ मिनिटांत विजयी
समीर वर्माने  एकतर्फी विजय संपादन केला. त्याने अवघ्या ४२ मिनिटांत अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला. त्याने लढतीत बिगरमानांकित विंग की विन्सेनट वागचा पराभव केला. त्याने २१-१९, २१-१३ अशा फरकाने सामना जिंकला. अाता अापली ही विजयाची लय कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. यासाठी ताे सज्ज अाहे.  
 
सिंधूचा एकतर्फी विजय 
रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेतील राैप्यपदक विजेत्या पी.व्ही.सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम १६ मध्ये एकतर्फी विजय संपादन केला. तिने लढतीत जिंदापाॅल निच्चाेनवर मात केली. तिने २२-२०, २१-१७ ने एकहाती विजयाची नाेंद केली. यासाठी तिने सरस खेळी करताना अवघ्या ४२ मिनिटांमध्ये विजयश्री खेचून अाणली. अाता अापली लय कायम ठेवत फायनल गाठण्याचा तिचा मानस अाहे. तिचा अंतिम अाठमधील सामना जपानच्या मिनात्सु मितानीशी हाेईल.
बातम्या आणखी आहेत...