आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कश्यप, समीरची उपांत्यपूर्व फेरीत धडक; प्रणयची अागेकूच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनाहेईम- राष्ट्रकुलचा चॅम्पियन पी. कश्यप, समीर वर्मा अाणि एच. एस. प्रणयने विजयी माेहीम कायम ठेवताना शुक्रवारी अमेरिकन अाेपन ग्रांप्री गाेल्ड बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसरीकडे मेघना अाणि पूर्वीषाला महिला दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यापाठाेपाठ मनू अत्री अाणि मनीषाचे मिश्र दुहेरीतील अाव्हान संपुष्टात अाले. अाता भारताची मदार पुुरुष एकेरीत तीन दिग्गज अाणि अनुभवी खेळाडूंवर असेल. 
 
दुसऱ्या मानांकित प्रणयने तिसऱ्या फेरीत अायर्लंडच्या जाेशुअा मेगीचा पराभव केला. त्याने २१-१३, २१-१७ अशा फरकाने विजय संपादन केला. यासह त्याने पुढची फेरी गाठली. अाता त्याचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना अाठव्या मानांकित कांताशी हाेईल.   

दुसरीकडे मेघना अाणि पूर्वीषाचा महिला दुहेरीत पराभव झाला. त्यांना सातव्या मानांकित मायू-वकानाने पराभूत केले. सातव्या मानांकित जाेडीने २१-१८, २१-९ ने मात दिली. मनू अाणि मनीषाला चाैथ्या मानांकित गाेह सून-शेवाेनने २१-१६, २१-१२ ने पराभूत केले.   

कश्यपचा विजय 
पी.कश्यपने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत श्रीलंकेच्या निलुका करुणारत्नेचा पराभव केला. त्याने रंगतदार लढत सरळ दाेन गेममध्ये जिंकली. त्याने २१-१९, २१-१० अशा फरकाने सहज बाजी मारून अंतिम अाठमध्ये प्रवेश केला. त्याला दुसऱ्या फेरीत विजयी घाेषित करण्यात अाले हाेते. हंगेरीच्या जाॅर्जिलीने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे कश्यप तिसऱ्या फेरीत दाखल झाला हाेता. त्यानंतर त्याने या ठिकाणी विजय संपादन केला.  

समीरकडून येगाेरचा पराभव 
पाचव्या मानांकित समीर वर्माने तिसऱ्या फेरीत ब्राझीलच्या येगाेरला पराभूत केले. त्याने १८-२१, २१-१४, २१-१८ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला. पहिल्या गेममधील अपयशातून सावरलेल्या समीरने दमदार पुनरागमन केले अाणि दुसरा अाणि तिसरा गेम जिंकून सामना अापल्या नावे केला.   

समीर-कश्यप झुंजणार 
पुरुष एकेरीच्या अंतिम चारमधील प्रवेश निश्चित करण्यासाठी अाता पी. कश्यप अाणि समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत झंुजतील. या दाेघांनीही तिसऱ्या फेरीतील सामन्यात शानदार विजय संपादन केला  अाणि अंतिम अाठमध्ये प्रवेश केला. अाता भारताचे हे दाेन्ही खेळाडू समाेरासमाेर असतील.
बातम्या आणखी आहेत...