आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतत दशकभर एका स्वप्नाचा पाठलाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबई मॅरेथाॅनमधून अाॅलिम्पिक पात्रता गाठू न शकलेली कविता अाता संपली, अशी अावई उठवली गेली... अाता काही नाही तिने अापला घर - संसार सांभाळावा असे अनाहूत सल्ले दिले जाऊ लागले... पण अशा सल्ल्यांकडे दुर्लक्ष करीत कविताने ‘सॅफ’ गेम्समध्ये अशी काही कामगिरी केली की ‘रिअाे दी जानेरिअाे’ अाॅलिम्पिकसाठीच्या भारतीय संघातील तिचे स्थान पक्के झाले अाहे. सतत दशकभराहून अधिक काळ एका स्वप्नाचा पाठलाग केल्यानंतर शुक्रवारी तिचे हे स्वप्न सत्यात उतरले अाहे.

अाता नाही तर केव्हाच नाही अशी परिस्थिती अाली व कविताने तिच्यातील संघर्षशील वृत्तीचा प्रत्यय जगाला दाखवून दिला. कधी नव्हे इतकी ती बेभान धावत सुटली. इतकी तुफान धावली की अापले प्रतिस्पर्धी अापण तीन किलाेमीटरहून अधिक अंतरावर मागे साेडले अाहेत हेदेखील तिच्या लक्षात अाले नाही. कारण ध्येय फक्त एकच हाेते की अाज अापली सर्वाेत्तम कामगिरी करायची. जे स्वप्न कविता गत दशकभराहून अधिक काळापासून उराशी बाळगून हाेती, जे स्वप्न ती राेज रात्री पहात हाेती अन् राेज पहाटे त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी धावत हाेती त्या स्वप्नाचा पाठलाग करीत तिने अगदी २०१६ च्या प्रारंभी म्हणजे रिअाे अाॅलिम्पिकच्या उंबरठ्यावर गाठले. या स्वप्नात कुणाचा अडथळा येऊ नये म्हणून ती २.३० वाजता उठून पहाटे ३ वाजता धावायला प्रारंभ करीत हाेती.

.....मात्र तिजा नाही
गत २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकच्या तयारीसाठी संभावित संघात कविताची निवड झाली हाेती, परंतु तब्येत बिघडल्याने तिचे ऑलिम्पिकचे स्वप्न धूसर झाले हाेते. २०१२ मध्ये झालेल्या लंडन अाॅलिम्पिकमध्येच धावण्याची कविताची इच्छा हाेती. मात्र, तत्कालीन भारतीय अाॅलिम्पिक समितीच्या अध्यक्षांवर झालेल्या कारवाईमुळे चांगला विदेशी काेच मिळणेच कविताला शक्य झाले नव्हते. एेनवेळी जे काेच मिळाले त्यांनी अतिरिक्त सराव करून घेतल्याने तिच्या पायाला दुखापत झाल्याने अपेक्षित वेळ गाठणे तिला अखेरपर्यंत शक्य झाले नव्हते. त्यामुळे यंदा इजा-बिजा-तिजा हाेऊ द्यायचे नाही हे तिने केव्हाच ठरवले हाेते.

कर्तव्यात नाही केली कुठलीही कसूर
घरच्यांच्या अाग्रहाने कविताने २०१३ मध्ये लग्न केले. त्यानंतर सासरी प्रत्येक कर्तव्य पार पाडत व एकीकडे अापला सराव सांभाळत कविताने तिच्या कर्तव्यदक्षपणाचा प्रत्यय सगळ्यांना दिला. सहा महिन्यांपूर्वी तिच्या सासऱ्यांचा अपघात झाल्याने संपूर्ण कुटुंबाप्रमाणेच अहाेरात्र जागून तिने त्यांची सेवाशुश्रूषा केली. मात्र, हे सारं काही करताना तिचा सराव बुडू न देण्याचा नियमदेखील तिने कटाक्षाने पाळला.