आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेल्सीविरुद्ध कवानी ठरला हीरो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - पीएसजीचा (पॅरिस सेंटजरमेन)चा वेगवान स्ट्रायकर एडिसन कवानीने अखेरच्या क्षणी केलेल्या दमदार गोलच्या बळावर पीएसजीने चेल्सीला २-१ ने हरवले. यूएफ चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम-१६ राउंडचा हा सामना होता.

सामन्याचा पहिला गोल पीएसजीच्या इब्राहिमोविकने केला. चेल्सीने यानंतर सलग हल्ले केले. यामुळे त्यांचा आक्रमक खेळाडू जॉन ओबी मिकेलने बरोबरीचा गोल केला. १-१ असा बरोबरीचा सामना असताना पीएसजीने बेंचवर बसलेल्या एडिसन कवानीला मैदानात उतरवले. कवानी मैदानात येताच चेल्सीच्या सुरक्षा फळीत वेगाने पळत जोरदार प्रहार करून गोल केला. कवानीचा हा गोल निर्णायक ठरला आणि पीएसजीने २-१ अशा गोल फरकानेे विजय मिळवला.

रेड कार्ड दाखवल्याने रेफ्रीची केली हत्या
कॉरडोबा प्रोव्हिन्स | सामन्यादरम्यान रेफ्रीने रेड कार्ड दाखवल्याने अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूने रेफ्रीची गोळ्या घालून हत्या केली. कॉरडोबा प्रोव्हिन्समध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ही घटना घडली. फुटबॉलपटू हत्या करून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधीनुसार रेड कार्ड दाखवल्याने त्या फुटबॉलपटूने रागाच्या भरात आपल्या बॅगमधून बंदूक काढून ४८ वर्षीय रेफ्री सीझर फ्लोरेसवर गोळ्या झाडल्या.