आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्फिंग, वॉटरपोलोत चॅम्पियन आहे गिलख्रिस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफाेर्निया - दोन खेळांत सहभागी होणे वाटते इतके सोपे काम नाही, असे अमेरिकेची वॉटर स्पोर्ट्सची खेळाडू केली गिलख्रिस्ट म्हणते. न्यू पोर्ट बीचजवळ राहणारी केली वॉटरपोलो आणि सर्फिंग या दोन्ही खेळांत चॅम्पियन आहे. या दोन खेळांत एकाची निवड करण्यात ती नेहमी द्विधा मन:स्थितीत असते.

ती हायस्कूलमध्ये होती तेव्हा तिने सर्फिंगमध्ये अमेरिकेतील सर्वाधिक प्रतिष्ठित "द सर्फिंग यूएसए चॅम्पियनशिप' किताब दोन वेळा जिंकला होता. तिने अंडर-१८ मध्ये वर्ल्ड नंबर १ कोर्टनी कोनोलोग आणि नंबर सहाची लेकी पेटरसनला मागे टाकले. सध्या ती रिअो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या वॉटरपोलो टीमची सदस्य आहे. ही टीम जगात सर्वोत्तम आहे. केली वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पटकावणाऱ्या अमेरिकन टीमची सदस्यसुद्धा होती. मात्र, अजूनही तिच्या मनात सर्फिंगबद्दल आकर्षण कायम आहे.
एकवेळ अशी होती की, ती सकाळी ६ वाजता उठून मेनहटन बीचवर जाऊन सर्फिंग करायची. यानंतर वॉटरपोलोचा सराव करायची. हा तिचा रोजचा नित्यक्रम ठरला होता. ती रोज दोन ते चार दोन्ही खेळांचा सराव करायची. "मी वेडी आहे, असे लोकांना वाटायचे. होय, मी वेडीच आहे. मी या दोन खेळांसाठी वेडी आहे,' असे केली म्हणते. "मी १४ वर्षांची होते तेव्हा अमेरिकन सर्फिंग टीमच्या मुख्य प्रशिक्षकाने मला हंटिगनटन बीचवर सर्फिंग करताना पाहिले. तेव्हा त्यांनी मला अमेरिकन टीमसाठी ट्रायल देण्यास सांिगतले. मात्र, जायचे नव्हते. आईने मला पाठवले. माझी पाच सदस्यीय अमेरिकन सर्फिंग टीममध्ये निवड झाली. मी पहिल्या आयएसए वर्ल्ड सर्फ स्पर्धेत सहभाग घेतला. त्याच वर्षी न्यूपोर्ट हार्बर हायस्कूलच्या वॉटरपोलो संघाच्या कोचनेसुद्धा मला निवडले. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड ज्युनियर सर्फिंगमध्ये मी नववे स्थान पटकावले. यानंतर मी कॉलेज पातळीवर वॉटरपोलो खेळण्यास सुरुवात केली. मात्र, सर्फिंगची आवड अजूनही मनात कायम होती. यामुळे मी वाॅटरपोलोला करिअर म्हणून व सर्फिंगला छंद म्हणून खेळण्याचे ठरवले. या दोन्ही खेळांतील हा प्रवास कायम आहे. संघाला सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देण्याचे आता माझे लक्ष्य आहे,' असेही केलीने म्हटले.