आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिसपरी स्टेफी ग्राफ झाली केरळच्या आयुर्वेद पद्धतीची ब्रॅंड अॅम्बॅसिडर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुअनंतपुरम (केरळ)- देवाचा देश अशी ओळख असलेल्या केरळच्या आयुर्वेदाची ब्रॅंड अॅम्बॅसिडर म्हणून स्टेफी ग्राफची आज (बुधवार) निवड करण्यात आली. मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री चंडी म्हणाले, की केरळ सरकारने केरळ भेटीची योजना जाहीर केली आहे. त्या अंतर्गत स्टेफी ग्राफसोबत करार करण्यास पर्यटन विभागाला मंजुरी देण्यात आली आहे.
टेनिस कारकिर्दीत स्टेफी ग्राफला एकूण 22 ग्रॅंड स्लॅम मिळाले आहेत. जर्मनीची माजी वर्ल्ड नंबर वन प्लेअर स्टेफी ग्राफसोबत प्रदीर्घ चर्चेनंतर केरळच्या पर्यटन मंत्रालयाने करार केला आहे.
46 वर्षांच्या स्टेफी ग्राफने 1999 मध्ये टेनिसमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तिने ऑक्टोबर 2001 मध्ये टेनिस प्लेअर आंध्रे आगासी याच्यासोबत लग्न केले.
केरळमधील आयुर्वेद पद्धत फारच लोकप्रिय आहे. देश-विदेशातून अनेक पर्यटक केवळ आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी केरळला येतात.