आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्बरने जिंकले दुसरे ग्रँडस्लॅम किताब, फायनलमध्ये प्लिस्कोवाला हरवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - जगातली नंबर वन खेळाडू जर्मनीची अँजोलिक कर्बरने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. कर्बरने फायनलमध्ये दहावी मानांकित चेक गणराज्यची कॅरोलिना प्लिस्कोवाला सामन्यात ६-३, ४-६, ६-४ ने हरवले. हा सामना दोन तास आणि ७ मिनिटे रंगला. २८ वर्षीय कर्बरचे हे करिअरमधील पहिले अमेरिकन ओपनचे विजेतेपद आहे. कर्बरचे हे वर्षातील दुसरे ग्रँडस्लॅम ठरले. तिने या वर्षी तीन ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये धडक दिली आणि दोनचे किताब पटकावले.

१९९६ मध्ये स्टेफी ग्राफनंतर कर्बर अमेरिकन ओपनचे ग्रँडस्लॅम जिंकणारी जर्मनीची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. याआधी कर्बरने जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये सेरेना विल्यम्सला हरवून किताब जिंकला होता. मात्र, विम्बल्डनच्या फायनलमध्ये सेरेनाकडून तिचा पराभव झाला होता. कर्बरने सेमीफायनलमध्ये डेन्मार्कच्या वोज्नियाकीला ६-४, ६-३ ने हरवून फायनलमध्ये स्थान मिळवले होते.

असा जिंकला सामना
पहिल्या सेटमध्ये प्लिस्कोवाच्या डबल फॉल्टमुळे कर्बर सेट पॉइंटपर्यंत पोहोचली. नंतर तिने फोरहँड शॉटम्रून ४४ मिनिटांत सेट आपल्या नावे केला. चेकच्या प्लिस्कोवाने पहिला ब्रेक पॉइंट मिळवून दुसऱ्या सेटमध्ये ४-३ ने आघाडी घेतली. याच्या तीन गेमनंतर प्लिस्कोवाने सर्व्हिस करताना शानदार ऐस मारून सेट पॉइंट गाठले. तिने दुसरा सेट जिंकत सामना १-१ ने बरोबरीत केला. दुसऱ्या सेटमध्ये थोडा नकारात्मक खेळ केल्याचे कर्बरने मान्य केले. तिसऱ्या सेटमध्ये कर्बरने अनुभवाची प्रचिती देताना बाजी मारली आणि सामना जिंकला.
कर्बरचे विजयी अश्रू...
प्लिस्कोवाचा अखेरचा फोरहँड बाहेर जाताच कर्बरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिने जोरदार जल्लोष केला. बॉक्समध्ये तिचे कोच टोर्बेन बेल्ज बसलेले होते. कर्बर त्यांच्याकडे गेली. नंतर कोर्टवर परतली. या वेळी ती आपले आनंदाश्रू रोखू शकली नाही. कर्बरने मोठ्या सामन्यात खेळण्याच्या अनुभवाचा फायदा उचलला.
कर्बर नंबर वन
अँजोलिक कर्बर जगातील नंबर वन महिला खेळाडू बनली आहे. कर्बरने सेरेना विल्यम्सला दूर करून नंबर वनचे सिंहासन पटकावले. सोमवारी जाहीर होणाऱ्या क्रमवारीच्या यादीत ती नंबर वन असेल. दुसरीकडे प्लिस्कोवाने फायनलपर्यंत पोहोचताना व्हीनस आणि सेरेना विल्यम्स भगिनींना हरवले होते.
करिअरमधील सर्वश्रेष्ठ वर्ष
^या विजयाला मी शब्दांत सांगू शकत नाही. एक वर्षात दुसरे ग्रँडस्लॅम जिंकणे शानदार आहे. हे माझ्या करिअरमधील सर्वश्रेष्ठ वर्ष ठरले आहे. नंबर वन बनणे आणि ग्रँडस्लॅम जिंकणे हे माझे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाले आहे.
- अँजोलिक कर्बर.
बातम्या आणखी आहेत...