आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: खलीचे रेसलिंग सेंटर घडवणार हजारो \'खली\', 3 विद्यार्थ्‍यांना 12.7 कोटींची ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खलीकडे दोन मुलीदेखिल प्रशिक्षण घेत आहेत. - Divya Marathi
खलीकडे दोन मुलीदेखिल प्रशिक्षण घेत आहेत.
भल्‍याभल्‍यांना धुळ चारून WWE मध्‍ये नाव कमावणारा पहिलवान दलीप सिंह राणा उर्फ द ग्रेट खली आता प्रशिक्षक बनला आहे. देशाच्‍या रेसलिंगसाठी तो नवीन सुपरस्‍टारच्‍या शोधात आहे. त्‍याने जालंधरजवळ असलेल्‍या कंगनीवाल या गावात रेसलिंग सेंटर सुरू केले आहे. तेथे तो युवकांना ट्रेन करत आहे.

खलीच्‍या ट्रेनिंग सेंटरमध्‍ये सध्‍या दोन महिलांसह एकूण 50 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. ते म्‍हणतात की, 'खली चांगला शिक्षक आहे. त्‍याचे ध्‍येय स्‍पष्‍ट आहे. त्‍यामुळेच त्‍याच्‍या तीन विद्यार्थ्‍यांना WWE कडून ऑफरही मिळाली आहे.' खलीच्‍या तीन विद्यार्थ्‍यांना प्रतिवर्ष 12.7 कोटी रूपयांची ऑफर WWE कडून देण्‍यात आली आहे.
काय म्‍हणतो खली
आपल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या या यशावर खली म्‍हणतो की, 'देशात हजारो खली मला तयार करायचे आहेत. त्‍यासाठी मी प्रचंड मेहनत घेत आहे.'
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण देणा-या खलीचे खास फोटो..