आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका गुद्द्यात खलीने केले होते बिग शोला बेशुध्‍द, वांशिक टिप्पणीला दिले उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खली आणि बिग शोची एक मॅच दरम्यानचे छायाचित्र. फाइल फोटो. - Divya Marathi
खली आणि बिग शोची एक मॅच दरम्यानचे छायाचित्र. फाइल फोटो.
डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर द ग्रेट खली अमेरिकेत वांशिक टिप्पणींचा शिकार झाला होता. त्याला काही रेसलर्संनी आपली बूट उचलण्‍यास सांगितले होते, तर काहींनी अपशब्दाही वापरले होते. मात्र खलीने टिप्पणींकडे दुर्लक्ष करुन त्या रेसलर्संना रिंगमध्‍ये धडा शिकवला. याबाबतचा खुलासा त्याने बुधवारी (ता.27) चंडीगडमध्‍ये केला. येथे खली सेलिब्रिटी क्रिकेट लीगला प्रमोट करण्‍यासाठी आला होता.
जाणून घ्‍या बिग शोच्या सामन्यानंतर का खलीला आला राग...
खलीने सांगितले, की जेव्हा तो भारतातून अमेरिकेत गेला तेव्हा त्याला वांशिक टिप्पणींचा शिकार व्हावे लागले. यात डब्ल्यूडब्ल्यूईमध्‍ये अंडरटेकरला हरवणे आणि वर्ल्ड हेविवेट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर वाढ झाली. नेहमी रिंगमध्‍ये रेसलर त्याच्यावर अपशब्दांचा प्रयोग करत असे. एका टॅग टीम मॅचमध्‍ये त्याच्याबरोबर अंडरटेकर आणि केन होते, दुस-या बाजूने सीएम पंक, बिग शो आणि मार्क हेन्री. हे मॅच त्याच्या टीमने जिंकला. मॅचनंतर ते लॉकर रुममध्‍ये पोहोचले, तर तिथे बिग शो होता. त्यांने खलीवर अपशब्दांचा मारा केला. शोने वांशिक टिप्पणी करताना त्यास बूट उचलण्‍यास सांगितले. खलीला प्रचंड राग आला. तो उठला आणि त्याने जोराचा एक गुद्दा शोला मारला. बिग शो त्याच वेळी जमिनीवर कोसळला. त्याला परत मारायला जात असताना खलीला उपस्थित रेसलर्संनी रोखले. काही वेळाने तेथे मॅनेजर आला आणि त्याने याची सूचना चेअरमनला दिली. चेअरमनने त्या दोघांचे भांडण मिटवले. या नंतर बिग शो कधीच खलीशी जास्त बोलला नाही. अशीच घटना अंडरटेकरबरोबर घडली.
पुढे वाचा कोणत्या कारणामुळे खलीने डब्ल्यूडब्ल्यूई सोडले...