आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खलीने घेतला बदला, हॉटेलात घुसून अमेरिकन रेसलर्सला लोखंडी रॉडने धुतले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रॉडी स्टीलच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करताना ग्रेट खली... - Divya Marathi
ब्रॉडी स्टीलच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करताना ग्रेट खली...
पानीपत- स्वर्ण महलला हॉटेल सोमवारी सायंकाळी अखाड्याचे स्वरूप आले होते. येथे द ग्रेट खलीने हॉटेल रूममध्ये घुसून विदेशी रेसलर्स ब्रॉडी स्टील आणि माईक नोक्स यांनी लोखंडी पाईपने जोरदार धुलाई केली. तेथे खूप राडा झाला. त्याआधी 8 ऑक्टोबरला विदेशी रेसलर्सनी खलीच्या अकादमीची तोडफोड केली होती. खलीने हे पाऊल बदला घेण्यासाठीच उचलले हे उघड आहे. दरम्यान, अनेक जण या घटनेकडे 12 ऑक्टोबर रोजी होणा-या फाईटच्या आधी पब्लिसिटी स्टंट म्हणून पाहत आहेत. धुलाईनंतर खलीलाही मिळाली धमकी....
- खलीने विदेशी रेसलर्सची धुलाई केल्यानंतर जखमी ब्रॉडी स्टीलने खलीला धमकी दिली आहे की, 12 ऑक्टोबर रोजी सेक्टर 13-17 तील मैदानावर होणा-या सीडब्ल्यूई फाईटमध्ये बदला घेऊ.
- खलीने सुद्धा त्याला उत्तर देताना पाहून घेऊ अशी धमकी दिली. या मारहाणीचा 2 मिनिट 10 सेकंदाचा व्हिडियो वायरल करण्यात आला आहे.
- आपल्याला माहित असेलच की, 8 ऑक्टोबर रोजी गुरगावमध्ये होणारी सीडब्लूई फाईट रद्द झाल्यानंतर अमेरिकी रेसलर्सने शनिवारी जालंधर स्थित खलीच्या अकादमीची तोडफोड केली होती.
या रेसलर्सनी घेतलाय सहभाग-
- सीडब्ल्यूई फाईटमध्ये 14 आंतरराष्ट्रीय रेसलर आणि 4 महिला रेसलर यांनी सहभाग घेतला आहे. सर्व रेसलर पानीपतमध्ये पोहचले आहेत.
- या माईक नोक्स, रोब टेरी, ब्रॉडी स्टील, माईक टारवान, रेबल, केटी आणि जेमी जेस, जस्टिन किंग, अपोलो, हेरनंडेज, क्रिस मास्टर, सॅम शो सहभागी घेतला आहे.
- याशिवाय अतिरिक्त भारतीय पैलवानात खलीचे अनेक पैलवान आहेत. यात महिला पैलवान कविताचाही समावेश आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या घटनेचे फोटोज....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...