आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Tennis Star Serena Williams Personal Life

HBD- या गोष्‍टींमुळे सेरेना राहते नेहमी चर्चेत, ग्‍लॅमरस फोटोसह जाणून घ्‍या Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला टेनिस जगतातील सर्वश्रेष्‍ठ खेळाडूंपैकी एक असलेली अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्‍यम्‍स हिचा आज वाढदिवस. 26 सप्टेंबर, 1981 जन्‍मलेल्‍या सेरेनाने टेनिसमध्‍ये विविध विक्रम नावावर केले आहेत. टेनिसबरोबर तिचे वैयक्‍तिक आयुष्‍यही तेवढेच रंजक आहे. सेरेना तिच्‍या कपड्यांमुळे, बॉयफ्रेंड, मॉडेलिंग, फोटोशुटमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. divyamarathi.com च्‍या या पॅकेजमधून जाणून घेऊया सेरेनाचे विविध पैलू.
बॉयफ्रेंडमुळे असते चर्चेत
टेनिस प्लेयर ग्रिगोर दिमित्रोव्हला हा कधीकाळी सेरेनाचा बॉयफ्रेंड होता. त्यांच्यात वाद झाला, तेव्हा सेरेनाने त्याला काळ्या काळजाचा म्हटले होते. सेरेनाचा नवा बॉयफ्रेंड पेट्रिक मोर्टोग्लू होता. शारापोव्हाने त्‍याच्‍याबद्दल अभद्र टिका केली होती. तेव्‍हा दोघींचा वाद चव्‍हाट्यावर आला होता. सेरेना तिच्‍या बॉयफ्रेंडमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.
सेरेनाच्‍या काही खास बाबी
- सेरेनाचा जन्म 26 सप्टेंबर 1981 रोजी मिशिगन राज्याच्या सॅगिनाऊ शहरात झाला.
- सेरेनाचे वडील रिचर्ड विल्यम्स व आई ओरॅसीन प्राइस हे दोघे आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत.
- सेरेनाला वीनस ही सख्‍खी मोठी बहिण, तर सावत्र पाच बहिणी आहेत.
- सर्वात लहान असलेल्‍या सेरेनाने तीन वर्षाची असतानाच टेनिस खेळणे सुरू केल होते.
- सेरेनाला विविध छंद आहेत. काही अॅनिमेटेज शोसाठी तिने आवाजही दिला आहे.
- सेरेना 9 वर्षाची होती. तेव्‍हा सुरूवातीच्‍या प्रशिक्षणानंतर तिच्‍या वडिलांनी दोघी बहिणींचे प्रशिक्षण बंद करून शालेय अभ्‍यासाकडे लक्ष देण्‍याचे बजावले होते.
- सेरेनाच्‍या वडिलांनी काही गो-या वंशाच्‍या लोकांकडून तिच्‍या खेळाचे कौतुक ऐकले व विचार बदलला. 1995 मध्‍ये त्‍यांनी स्‍वत:च मुलींना प्रशिक्षण दिले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सेरेनाचे ग्‍लॅमरस फोटो आणि व्‍यक्‍तिमत्‍वाचे विविध पैलू..