आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kuljeetsingh Daroga Sports Awards Issue At Aurangabad

दरोगा यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवला क्रीडा पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव कुलजितसिंग दरोगा यांनी बोगस कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षरीच्या आधारे जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळवला, असा आरोप राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिसपटू हरविंदरसिंग संधू यांनी पत्रकार परिषदेत केला.

दरोगा यांनी एकाही खेळाडूला प्रशिक्षण दिलेले नाही. त्यांनी एकही राज्य, राष्ट्रीय खेळाडू घडवला नाही. पुरस्कारासाठी प्रस्तावातील विहित नमुन्यानुसार खेळाडूंचे हमीपत्र सादर केले नाही. त्यांनी खेळाडूंना खोटी माहिती देऊन कोऱ्या कागदावर हमीपत्रासारखा मजकूर लिहून त्यावर सह्या घेतल्या. त्यावर त्यांना प्रशिक्षण दिल्याचा कालावधीदेखील नमूद करण्यात आलेला नाही. सुशांत उबाळे हा खेळाडू विदेशात असतानादेखील त्याच्या नावे खोटी स्वाक्षरी करून हमीपत्र सादर केले. जिल्ह्यात प्रवीण भुजबळ, सचिन पुरी, नदीमभाईंसारखे प्रशिक्षक असताना त्यांना दरोगा यांनी स्वत:साठी डावलले, असा आरोप संधू यांनी केला.

परिषदेतील संधूंचे मुद्दे
> बंद लिफाफ्याचा प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम तारीख १५-४-२०१४ असताना दरोगा यांना १७-४-२०१५ रोजी मिळालेले रहिवासी प्रमाणपत्र माहितीच्या अधिकारात मिळाले.
> संघटनेच्या २४-३-२०१४ रोजी झालेल्या बैठकीत दरोगा यांना पुरस्कारासाठी नामांकित करण्याचे ठरले असल्याचे संघटनेच्या लेटरहेडवरील पत्र २०-३-२०१४ रोजी दिले.
> सादर केलेल्या प्रस्तावावर दरोगा यांच्या विविध चार प्रकारच्या स्वाक्षऱ्या आढळतात.
> डीएसओने माहितीच्या अधिकारात प्रथम ७० कागदपत्रे पत्राद्वारे सांगितले व त्यानंतर ७१ कागदपत्रे वाढल्याचे सांगत एकूण १४१ कागदपत्रे दिली. कागद नंतर वाढल्याचा संशय.
> दरोगा यांनी सचिवपदाच्या कार्यकाळात अनेक मोठ्या स्पर्धा घेतल्या. त्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल. चौकशीची मागणी.
> धर्मादाय आयुक्तांकडे संघटनेच्या कामकाजास मनाई हुकुमासाठी अर्ज केल्याचे संधूंचे म्हणणे.