आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फराहसाेबत धावल्याने अात्मविश्वास द्विगुणित! भारताच्या लक्ष्मणनची प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या जगातील अव्वल धावपटू माे. फराहसाेबत एकाच ट्रॅकवर धावल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले. याशिवाय माझा अात्मविश्वास द्विगुणित झाला. इंग्लंडच्या धावपटूसाेबतच अनुभव हा करिअरमधील अविस्मरणीय ठरणार अाहे.  मला या अनुभवाची शिदाेरी अायुष्यभर प्राेत्साहन देणारी अाहे, अशी प्रतिक्रिया भारताचा लांब पल्ल्याचा धावपटू गाेविंदन लक्ष्मणनने दिली. त्याने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील पुरुष गटाच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या गटाच्या पहिल्या हिटमध्ये ताे सहभागी झाला हाेता. याच हिटमध्ये १० हजार मीटरचा वर्ल्ड चॅम्पियन माे. फराहदेखील धावला.   

गाेविंदन लक्ष्मणन ३१ व्या स्थानावर
पुुरुषांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये गाेंविदन लक्ष्मणनने नशीब अाजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामधील पहिल्याच हिटमध्ये ताे अयपशी ठरला. त्याला ३१ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने १३ मिनिटे ३६.६२ सेकंदांमध्ये निश्चित अंतर पूर्ण केले. त्याने  करिअरमधील सर्वाेत्कृष्ट वेळेची नाेंद केली.  

फ्रान्सिसला सुवर्णपदक 
अमेरिकेची अव्वल धावपटू फ्यालिस फ्रान्सिसने महिलांच्या गटात सुवर्णपदकाची कमाई केली. तिने महिला गटातील ४०० मीटर धावण्याची शर्यत जिंकली. तिने ४९.९२ सेकंदांमध्ये निश्चित अंतर पूर्ण करून अव्वल स्थान गाठले. या गटात साल्वा नासेरने (५०.०६ से.) दुसऱ्या स्थानावर धडक मारली. त्यापाठाेपाठ अमेरिकेची फेलिक्स ५०.०८ सेकंदांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीमध्ये क्रिर्स्टन वार्हाेल्म सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
बातम्या आणखी आहेत...