आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा 15 वर्षीय लक्ष्य सेन बनला जगातील नंबर वन!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- उत्तराखंडचा १५ वर्षीय लक्ष्य सेन बीडब्ल्यूएफच्या वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन क्रमवारीतील नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झाला. त्याने गाठलेल्या या अपूर्व लक्ष्यची सध्या बॅडमिंटनच्या विश्वात एकच चर्चा अाहे. त्याने हे यश अल्पावधीत मिळवले अाहे. त्यामुळे त्याची ही कामगिरी अनेक युवा प्रतिभावंत खेळाडूंसाठी प्रेरणादायी अाहे. सध्या साेशल मीडियातून त्याच्यावर काैतुकाचा वर्षाव केला जात अाहे. गुरुवारी  बीडब्ल्यूएफने  वर्ल्ड ज्युनियर अाणि सीनियरची बॅडमिंटन क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारताचा युवा खेळाडू चमकला.  

दहाव्या वर्षांपासून प्रकाश पदुकाेनकडे कोचिंग
लक्ष्य सेनने गतवर्षी ज्युनियरच्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले हाेते. याशिवाय त्याने अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या अाॅल इंडिया सीनियर रँकिंग स्पर्धेचा किताबही जिंकला हाेता. यामुळे त्याचा जागतिक क्रमवारीत नंबर वनचे स्थान गाठण्याचा मार्ग अधिक सुकर झाला. ताे अापल्या वयाच्या दहाव्या वर्षांपासून प्रकाश पदुकाेनकडे प्रशिक्षण घेत अाहे.

सायना नेहवालची घसरण 
भारताच्या सायना नेहवालला क्रमवारीमध्ये माेठा फटका बसला. तिची महिला एकेरीच्या क्रमवारीमध्ये नवव्या स्थानावर घसरण झाली. तिची एका स्थानाने घसरण झाली. तिला सत्रात अद्याप दमदार खेळी करता अाली नाही.  महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा अाणि अश्विनी पाेनप्पाची क्रमवारीत  २९ व्या स्थानावर घसरण झाली. 

समीर वर्माची प्रगती 
सय्यद माेदी अांतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील चॅम्पियन समीर वर्माने क्रमवारीमध्ये माेठी झेप घेतली. त्याने पुरुष एकेरीच्या टाॅप-२५ मध्ये धडक मारली. त्याला किताबामुळे दहा स्थानांनी प्रगती साधता अाली. त्याने २५ वे स्थान गाठले.

सिंधू सहाव्या स्थानी
रिअाे अाॅलिम्पिकमधील राैप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या क्रमवारीमध्ये प्रगती साधली. तिने सहाव्या स्थानावर धडक मारली. तिलातीन स्थानांचा फायदा झाला. तिने  सय्यद माेदी अांतरराष्ट्रीय स्पर्धेचा किताब पटकावला.
बातम्या आणखी आहेत...