आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गवत कापणाऱ्या गाड्यांची शर्यत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाॅरशम (इंग्लंड) - हे छायाचित्र लाॅन माेवर्स रेसचे अाहे. या रेसमध्ये लाॅनचे गवत कापणारी मशीन असलेल्या गाडीचा वापर हाेताे. यासाठी या रेसचे नाव लाॅन माेवर्स अाहे. ही रेस अाॅस्ट्रेलिया, अमेरिका अाणि इंग्लंडमध्ये चांगलीच लाेकप्रिय अाहे. ही रेस माेटार स्पाेर्ट््सअंतर्गत अाहे. सुरुवातीला केवळ मनाेरंजन म्हणून ही रेस अायाेजित केली जात असे. मात्र, या रेसमध्ये प्रतिस्पर्धी असतात. यात सर्वच वयाेगटातील खेळाडू सहभागी हाेऊ शकतात. मेपासून अाॅक्टाेबरपर्यंंत या इव्हेंटचे अायाेजन केले जाते. यात ब्रिटिश चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, ब्रिटिश ग्रांप्री, द इंड्यूरन्स चॅम्पियनशिप अाणि १२ तासाच्या इंड्यूरन्स रेस सहभागी अाहेत. १९७३ मध्ये अायर्लंडच्या जीम गाेविनने याची सुरुवात केली. त्यांना माेटार स्पाेर्ट््सची अावड हाेती.

स्वस्तातील रेस अायाेजनावर त्यांचा भर असे. एकदा ते क्रिकेटच्या मैदानावर बसले हाेते. या ठिकाणी एक कर्मचारी लाॅन माेवर्स मशीनने गवत कापत हाेता.यातून लाॅन माेवर्स रेसची संकल्पना जिम यांना सुचली. सुरुवातीला यात लाॅन माेवर्स मशीन गाडीचा वापर व्हायचा.अाता लहान स्वरूपाच्या गाड्यांचा यात वापर केला हाेता.
बातम्या आणखी आहेत...