आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक मानांकन लॉन टेनिस; प्रार्थना, दक्षता, रम्याचा खेळ पाहण्याची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : साताराच्या आर्याली चव्हाण व मुंबईच्या दक्षता पटेलने दहा हजार डॉलरच्या जामश्री कंरडक जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. सोलापूरची (बार्शी) अॉलिम्पियन खेळाडू प्रार्थना ठोंबरेस मुख्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. तिचा खेळ सोमवारपासून सोलापूरकरांना पाहावयास मिळेल.
स्पर्धेत आर्यालीने बंगळुरूच्या आरतीन मुनियनला ६-४, ६-२ असे नमविले. विजयी खेळाडूंनी पात्रता फेरीत प्रवेश केला.

अन्य निकाल : दक्षता पटेल (मुंबई) वि. वि. आस्था दरगुडे (पुणे) ६-२, ६-३. सोहा सादिक (बंगळुरू) वि. वि. सई शिवानी (हैदराबाद) ६-०, ६-१. अनुष्का कोंडावती (हैदराबाद) वि. वि. शीतल शेट्टी (मुंबई) ६-०, ६-१.रम्या नटराजन (चैन्नई) वि.वि. अम्रीन नाझ (मुंबई)६-०, ६-१. वासवी गणेशन (चेन्नई) वि.वि. कृष्णाली भोनसाळे ६-१, ६-०. सई चामार्थी (बंगळुरू) सृष्टी दास (पुणे) ६-०, ६-२.
बातम्या आणखी आहेत...