आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा: लॅटव्हियाची डायना विजेती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लॅटव्हियाच्या डायना मार्सिनकेविकाने दहा हजार डॉलरच्या जामश्री करंडक लॉन टेनिस स्पर्धेतील एकेरीचे विजेतेपद पटकावले.

कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्यासाठी शनिवारी प्रिसिजन गॅलरी खचाखच भरली होती. डायनाने रशियाच्या अॅनास्तेसिया गॅसेनोव्हाचा ६-३, ७-६ (४) असा पराभव केला. अॅनास्तेसियाने नाणेफेक जिंकली व डायनाने तिची सर्व्हिस भेदत १ला गेम घेतला. पण नंतर अॅनास्तेसियाने ३-१ अशी आघाडी घेतली. मग डायनाने फोरहँडचा शानदार खेळ करत ३-३ अशी बरोबरी साधली. तीच लय कायम राखत डायनाने ६-३ असा पहिला सेट ३७ मिनिटांत जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये अॅनास्तेसियाने ४-३ अशी आघाडी घेतली असताना पुन्हा एकदा डायनाने अप्रतिम खेळ करत ५-५ अशी बरोबरी केली. ६-६ अशी गुणस्थिती झाली. टायब्रेकरमध्ये पहिला गेम अॅनास्तेसियाने जिंकला. नंतर १-१, २-२, ३-३ वरून डायनाने ६-३ अशी आघाडी घेतली. अॅनास्तेसियाने मॅच पॉइंट वाचवत ४-६ अशी गुणस्थिती ठेवली होती. डायनाने पुन्हा कमबॅक करत दुसरा सेट ६५ मिनिटांत ७-६(४) असा जिंकत एकेरीचे विजेतेपद निश्चित केले. अंतिम सामन्यासाठी श्रीलंकेचे दिनुशा व लीना नागेशकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...