आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

53 हजार कोटींत फॉर्म्युला वन रेसची खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- काररेसिंगच्या जगातील सर्वात मोठ्या चॅम्पियनशिप फॉर्म्युला वन शर्यतीला नवीन मालक मिळाला आहे. अमेरिकेतील अब्जाधीश जॉन सी मेलोन यांची कंपनी लिबर्टी मीडियाने विक्रमी अरब डॉलरमध्ये (जवळपास ५३ हजार कोटी रुपये) खरेदी केली. क्रीडा क्षेत्राच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी खरेदी मानली जात आहे.

यापूर्वी याच वर्षी फेरिटा ब्रदर्सने अल्टिमेट फ्लायटिंग चॅम्पियनशिपची अरब डॉलरमध्ये (२६.५ हजार कोटी रुपये) विक्री केली होती. अनेक लोकप्रिय चॅनल वेंचर लिबर्टीच्या अधीन आहेत. ज्यात डिस्कव्हरी चॅनलचादेखील समावेश आहे. फोर्ब्जनुसार जॉन मेलोन स्वत: ४७ हजार कोटी रुपयांचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीची किंमत त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. फॉर्म्युला वनला कोट्यधीश बनवणारे बर्नी एक्लेस्टन पुढील तीन वर्षांसाठी शर्यतीचे सीईओ असतील. ८५ वर्षीय एक्लेस्टन गेल्या ४० वर्षांपासून फॉर्म्युला वन शर्यतीचे बॉस आहेत. चेस कॅरी फॉर्म्युला वनचे नवे अध्यक्ष असतील. त्यांना न्यूज कॉर्पमध्ये मीडिया मुगल रूपर्ट मर्डोकचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. खरेदीची प्रक्रिया २०१७ पर्यंत पूर्ण होईल.

खरेदी करणारे जॉन..
७५ वर्षीय जॉन मेलोन लिबर्टी मीडियाचे मालक आहेत. त्यांनी १९६३ मध्ये बेल टेलिफोन लॅबोरेटरीजसोबत आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर ते मॅकिन्से अँड कंपनी, जनरल इन्स्ट्रूमेंट कॉर्पोरेशन, जेरॉल्ड इलेक्ट्रॉनिक्स, बँक ऑफ न्यूयॉर्क मेलोनसारख्या संस्थेशी जोडले गेले. निर्णयक्षमतेमुळे त्यांना मॅड मॅक्स म्हणूनही ओळखले जाते. मेलोनच्या लिबर्टी मीडियाकडे ५० पेक्षा अधिक चॅनल, स्पोर्ट‌्स एंटरटेन्मेंटमध्ये भागीदारी आहे.

यांंनी विकली कंंपनी
इंग्लंडचे बर्नी एक्लेस्टन हे आतापर्यंत फॉर्म्युला वनची मुख्य कंपनी असलेल्या डेल्टा टाॅपको कंपनीचे सहमालक होते. त्यांनी स्वबळावर गेल्या ४० वर्षांत या स्पर्धेला लोकप्रियतेची उंच शिखरे गाठून दिली होती. एफ-वनमध्ये त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात एक स्पर्धक म्हणून केली होती. १९७२ मध्ये त्यांनी बार्बहॅम टीम खरेदी केली. नंतर त्यांनी या स्पर्धेच्या व्यवस्थापन टीममध्ये प्रवेश केला आिण पुढे ते या स्पर्धेचे सर्वेसर्वा बनले. त्यांना तमारा, पेट्रा या मुली आहेत.
बातम्या आणखी आहेत...