आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एेतिहासिक विजयाने उंचावला तिरंगा; श्रीलंकेवर 1 डाव 171 धावांनी मात, भारताचा विक्रमी विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पल्लेकल - विराट काेहलीच्या सक्षम नेतृत्वात टीम इंडियाने साेमवारी यजमान श्रीलंकेविरुद्ध कसाेटी मालिकेत एेतिहासिक यशाची नाेंद केली. यासह भारताने  स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला माेठ्या डाैलाने तिरंगा उंचावला. टीम इंडियाने तिसऱ्या अाणि शेवटच्या कसाेटीत यजमान श्रीलंकेवर १ डाव १७१ धावांनी एेतिहासिक विजय संपादन केला.
 
तब्बल ३५ वर्षांनंतर भारताचा हा श्रीलंकेविरुद्धचा सर्वात माेठा विजय ठरला. याशिवाय भारताचा हा कसाेटीतील सर्वात माेठा चाैथा विजय ठरला. यासह भारताने तीन कसाेटी सामन्यांची मालिका ३-० ने अापल्या नावे केली. टीम इंडियाने ८५ वर्षांनंतर विदेशी खेळपट्टीवर तीन कसाेटी सामने जिंकण्याच्या विक्रमी यशाला गवसणी घातली.   

अव्वल फिरकीपटू अार. अश्विन (४/६८) अाणि शमीने (३/३२) धारदार गाेलंदाजी करताना टीम इंडियाला तिसऱ्याच दिवशी एेतिहासिक विजय मिळवून दिला. फाॅलाेअाॅननंतर खडतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेने या धारदार गाेलंदाजीपुढे लाेटांगण घातले अाणि दुसऱ्या डावात अवघ्या १८१ धावांमध्ये गाशा गुंडाळला.  श्रीलंकेकडून डिकवेलाने सर्वधिक ४१ धावांची खेळी केली. चांदिमल व मॅथ्यूजने पाचव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. मात्र, लंचनंतर श्रीलंका टीमची धूळधाण उडाली.    

भारताचा चाैथा सर्वात माेठा विजय
भारतने अापल्या कसाेटी इतिहासामध्ये सर्वात माेठ्या चाैथ्या विजयाची नाेंद केली. भारताने २००९ मध्ये श्रीलंकेला कानपूर कसाेटीत एक डाव १४४ धावांनी पराभूत केले हाेते. १९९८ मध्ये भारताने काेलकाता कसाेटीत अाॅस्ट्रेलियावर १ डाव अाणि २१९ धावांनी मात केली हाेती. त्यानंतर २०१० मध्ये नागपूर कसाेटीत भारताने पाहुण्या न्यूझीलंडवर १ डाव अाणि १९८ धावांनी विजय संपादन केला हाेता.    

अश्विन, शमी ठरले हीराे :  अश्विन अाणि माे. शमी एेतिहासिक विजयाचे हीराे ठरले. अश्विनने २८.३ षटकांत ६८ धावा देताना ४ विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने करुणारत्ने (१६), मॅथ्यूज (३५), परेरा (८) अाणि कुमारा (१०) यांना बाद केले. तसेच शमीने १५ षटकांत ३२ धावा देऊन तीन गडी बाद केले. त्यापाठाेपाठ उमेश यादवने दाेन अाणि कुलदीप यादवने १ विकेट घेतली. 
 
इतिहास रचणारा काेहली पहिला कर्णधार   
सक्षम नेतृत्वाच्या बळावर ८५ वर्षांनंतर भारताला एेतिहासिक विजय मिळवून देणारा विराट काेेहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला. त्याच्या नेतृत्वात भारताने श्रीलंका दाैऱ्यात ३-० ने कसाेटी मालिका जिंकली.
 
१९३२ नंतर पहिल्यांदा विदेशी खेळपट्टीवर विजयी विक्रम  
भारताने १९३२ मध्ये कसाेटी करिअरला सुरुवात केली. तेव्हापासून अाजतागायत पहिल्यांदा भारताला तीनपेक्षा अधिक कसाेटी सामन्यांच्या मालिकेत प्रतिस्पर्धीचा सुफडा साफ करण्याचा पराक्रम गाजवता अाला. भारताने ८५ वर्षांनंतर श्रीलंकेचा  मालिकेत ३-० ने सुफडा साफ केला.
 
तब्बल ५० वर्षांनंतर भारताने  मिळवले तीन कसाेटी विजय
भारताने ५० वर्षांनंतर काेणत्याही मालिकेमध्ये ३ कसाेटी जिंकण्याचा पराक्रम गाजवला. यापूर्वी भारताने १९६७ मध्ये न्यूझीलंड दाैऱ्यात हा पराक्रम गाजवला हाेता.  भारताने चार कसाेटी सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली हाेती. अाता पुन्हा भारताने हे यश श्रीलंका दाैऱ्यात मिळवले. 
 
पुढील स्‍लाइडवर...सामन्‍यातील क्षणचित्रे, धावफलक...
 
 
 
बातम्या आणखी आहेत...