आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान-ए-रिअाे! रंगारंग सोहळ्यात रिअाे अाॅलिम्पिकला प्रारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरिओ - कोट्यवधींच्या खर्चाला फाटा देत सांस्कृतिक श्रीमंती, सळसळती ऊर्जा आणि पृथ्वीला वाचवण्याची साद घालणारे सादरीकरण करत रिओ ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याने क्रीडाप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले. या सोहळ्याने ऑलिम्पिक जगतातील सर्वच राष्ट्रांपुढे काटकसरीचा एक वेगळाच आदर्श मांडला अन् तोसुद्धा त्याच तोडीच्या रोमहर्षकते सोबत. माराकाना येथील जगातील सर्वाधिक प्रेक्षक क्षमता असलेल्या मैदानात तब्बल ४ ते साडेचार तासांपर्यंत क्रीडाप्रेमींनी या सोहळयाचा याचि देही, याचि डोळा अनुभव घेतला. सांबा (नृत्य) आणि संगीत ही ब्राझिलियन संस्कृतीची अविभाज्य ओळख अन उद्घाटन सोहळ्यात याच सांबाने दर्शकांना मंत्रमुग्ध करून सोडले. ऑलिम्पिक चळवळीला अमूल्य योगदान दिल्याबद्दलच यंदा प्रथमच ‘ऑलिम्पिक लॉरेल’ पुरस्काराची सुरूवात करण्यात आली. याचा पहिला बहुमान केनियाचा माजी ऑलिम्पिकयन धावपटू किपचोगे किनो यांना मिळाला.
दरवेळच्या ऑलिम्पिक स्पर्धेचा अर्थसंकल्प हा पूर्वीपेक्षा फुगलेलाच असतो. मात्र, ब्राझीलने या सर्व संकल्पनांना फाटा देत अल्प खर्चामध्ये दर्जेदार सोहळा सादर करून नवा आदर्श निर्माण केला आहे. यात पृथ्वी वाचवण्याचा सृजनशील पद्धतीचा संदेशही देण्यात आला. झाडे लावण्याची कल्पना मांडताना त्यांनी खेळाडूंचा आधार घेतला, प्रत्येक खेळाडूत बीजरोपण केल्यानंतर उगवणारे झाड ही कल्पना पृथ्वीच्या गरजेची असल्याचे मांडण्यात आले.

व्यासपीठाच्या तळ भागाचाच स्क्रीनसारखा वापर करून पाणी, जहाज, पाण्याचा खळखळाट अन उगवलेली रोपटे दाखवण्यात आली. अत्यंत साधेपणाने मात्र समर्पक असे हे सादरीकरण प्रेक्षक डोळ्यात साठवून घ्यायला अातुरलेले दिसले.

चिकोचे संगीत जबरदस्त :‘सांबा दे अॅव्हिओ’ टॉम जॉबीनने सादर केले. ब्राझीलच्या संगीत क्षेत्रात मानाचे स्थान पटकावणारा इटालियन संगीतकार चिको ब्युरक्यूने सादर केलेल्या ‘कॉन्स्ट्रकाओ’ला तर प्रेक्षकांनी अगदी डोक्यावरच घेतले. टॉम जोबिमने मांडलेली ब्राझील, प्राणी, समुद्रकिनारा आणि रिओ शहरासंबंधित रचना, तर संगीत चाहत्यांना बहारदारच करून गेली. गिस एले बंडचेन या ब्राझीलियन जगप्रसिद्ध मॉडेलने तमाम विश्व पाकाक्रांत केले आहे. ऑलिम्पिक उद्घाटन सोहोळ्यातील तिचा ‘कॅट वॉक’ अखेरचा ठरण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा,
>आतषबाजी अन् सामाजिक भान...
>गुलामगिरी, संस्कृती अन् संदेश
>चोगेच्या भावना, युवकांना सल्ला
>उद्घाटन साेहळ्यातील खास
>जेहरा इराणची पहिली महिला ध्वजवाहक
> ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याच्या आतषबाजीचा व्हिडिओ अखेरच्या स्लाईडवर
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...