आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याचे १३ खेळाडू महाकबड्डीत !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्र कबड्डी संघटना आणि गॉडविल यांच्या सौजन्याने आयोजित महाकबड्डी लीगच्या दुसऱ्या सत्रात मराठवाड्याच्या खेळाडूंनी दबदबा राखला. मराठवाड्यातील तब्बल १३ खेळाडूंवर बोली लावत विविध संघमालकांनी त्यांच्याशी करार केला असल्याची माहिती लीगचे चेअरमन डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
मॅटवर होणाऱ्या कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात महिला-पुरुषांचे प्रत्येकी ८ संघ सहभागी होणार असून १२ ते २७ जानेवारीदरम्यान इनडोअर हॉलमध्ये स्पर्धा रंगणार आहेत. स्पर्धेचे उद‌्घाटन कोल्हापूर येथे आणि समारोप ठाणे येथे होणार असल्याचेही ते म्हणाले.
पहिल्या सत्रात केवळ मराठवाड्याच्या एकमेव खेळाडूने प्रतिनिधित्व केले होते. गतवर्षी प्रत्येक संघात केवळ १० खेळाडूंचा समावेश होता. यंदा मात्र खेळाडूंची संख्या १५ पर्यंत वाढवण्यात आल्याने आता युवा होतकरू खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध झाली. ज्या जिल्ह्यातील खेळाडूंना संधी मिळाली नाही तर त्यांना वाइल्ड कार्ड प्रवेश अनिवार्य ठेवण्यात आला आहे. औरंगाबादचे ७ तर जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक खेळाडू आणि उस्मानाबादच्या २ खेळाडूंची निवड झाली आहे.
आधुनिक खेळ सुरक्षित
कबड्डी खेळ आता आधुनिक स्वरूपात मॅटवर आला आहे. आता सुरक्षित खेळ झाल्याने युवा खेळाडूंचा ओढा याकडे वाढला. महालीगमुळे खेळाडूंना मोठे व्यासपीठ निर्माण झाले आणि पैसा मिळत आहे. मराठवाड्यात कबड्डी अकादमीचा विचार असल्याचे दत्ताभाऊ म्हणाले.

लाखो रुपये मिळणार : अ गटात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू असतील. यांना ३० हजार ते १ लाख ८० हजारांपर्यंत बोली लागली. ब गटात विद्यापीठ स्तर, राज्यस्तर आणि ज्युनियर राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असून त्यांना २० हजार ते १ लाखापर्यंत बोली लागली.
औरंगाबादच्या खेळाडूंवर लक्ष
मराठवाड्यातील खेळाडूंमध्ये सर्वाधिक ७ खेळाडू औरंगाबादचे आहेत. यात महिला गटात राष्ट्रीय खेळाडू सोनी जायभाय, अश्विनी आव्हाड, किशोरी हिवर्डे, सानी खरात आणि पुरुष गटात सुनील दुबिले आणि अतुल सोळुंके प्रतिनिधित्व करेल. प्रत्येकाचा तीन वर्षांचा करार करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...