आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Kesari Wrestling Championship From January 7 At Nagpur

महाराष्ट्र केसरी: आजपासून संत्रानगरीत रंगणार कुस्तीचा रोमांच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद नागपूर जिल्हा कुस्तिगीर संघाच्या यजमानपदाखाली आजपासून (गुरुवार) नागपुरातील चिटणीस पार्क स्टेडियमवर लाल मातीचा थरार रंगणार आहे. ५९ व्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी राज्यभरातील मातब्बर पहिलवान एकमेकांशी झंुजण्यास सज्ज आहेत.

गुरुवारी सकाळी वाजेपासून या स्पर्धांना सुरुवात होणार आहे. सर्व जिल्हा शहर विभागातून गादी मातीवरील ४४ संघ किताबाच्या शर्यतीत असून स्पर्धेसाठी १०० पंचही दाखल झाले आहेत. ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६, ९७ या वजन गटांत गादी माती प्रकारात पहिलवान झुंज देतील. ८६ ते १२५ किलो वजन गटात गादी माती प्रकारातील विजेत्यांदरम्यान महाराष्ट्र केसरी किताबासाठी कुस्ती १० जानेवारी रोजी सायंकाळी वाजता होईल.

औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, लातूर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, पिंपरी- चिंचवड, अहमदनगर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई मनपा, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, कल्याण, नागपूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ बुलडाणा येथील संघ जय्यत तयारीसह नागपुरात दाखल झाले आहेत. गुरुवारी सायं. वाजता उद्घाटन राज्याचे ऊर्जामंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल.

विजय चौधरी, विक्रांत जाधव, नीलेश लोखंडे केसरीपदाचे प्रबळ दावेदार
लालमातीच्या उत्सवात राज्यातील सर्वोत्तम पहिलवान असा मान मिळवण्यासाठी आठ दिग्गज मल्लांमध्ये खरी चुरस राहणार आहे. यात गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी, मुंबईचा विक्रांत जाधव आणि सोलापूरचा नीलेश लाेखंडे या तीन पहिलवानांना किताबाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या अनुभवी कुस्तीतज्ज्ञांनी या तीन मातब्बर पहिलवानांच्या बाजूने निर्णय देत यापैकी एखादा यंदा बाजी मारू शकतो, असे मत व्यक्त केले. ८६ िकलोवरील वजन गटात केसरी पदासाठी पुण्याचा सचिन येलभर, साताऱ्याचा िकरण भगत, सोलापूरचा रफिक शेख आणि पुण्याचा रवी गायकवाडही अचानक मुसंडी मारून वर येऊ शकतात. कारण ते वेगाने लढतात तसेच कसलेल्या शरीराचे चपळ पहिलवान असल्याचे मत माजी पंचम विदर्भ केसरी संजय तिरथकर, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव यांनी व्यक्त केले.

असे आहेत पुरस्कार
महाराष्ट्रकेसरी पदासाठी स्व. मामासाहेब मोहोड स्मृती चांदीची गदा तसेच रोख एक लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल. तसेच उपविजेत्या मल्लाला ५१ हजार रु.चा रोख पुरस्कार प्रदान केला जाईल. अन्य वजन गटात दररोज एका गटाचा विजेता घोषित होईल. तीन कुस्तीपटूंना सुवर्ण, रौप्य कांस्यपदकाने गौरवण्यात येईल.

३५ जिल्ह्यांचे एकूण ४४ संघ
राज्यातील३५ जिल्ह्यांच्या एकूण ४४ संघांतील ७०४ कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबाच्या शर्यतीत आहेत. तसेच १७६ व्यवस्थापक प्रशिक्षकही नागपुरात पोहोचले आहेत. राज्यात ज्या ठिकाणी महानगरपालिका आहेत त्या ठिकाणचे शहर ग्रामीण असे दोन संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.