आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Kesari Wrestling Championship In Nagpur. Marathi News

महाराष्ट्र केसरी: 75 किलो वजन गटातील गादीवर नवनाथ चमकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- चिटणीस पार्क स्टेडियमवरील ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दुसऱ्या िदवशी अाैरंगाबादचा नवनाथ अाैताडे चमकला. त्याने ७५ किलो वजन गटातील गादीवर कांस्यपदकाची कमाई केली. त्याने पाच मिनिटांत तानाजी वीरकरला चीतपट केले.

दुसरीकडे महाराष्ट्र केसरी माती विभागात पहिल्याच फेरीत अहमदनगर येथील गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी गटाचा उपविजेता सचिन येलबर याला बीडच्या गोकुळ आवारी (बीड) धूळ चारून पराभवाचा दणका िदला. त्याचप्रमाणे विजय गुटाळ (सोलापूर शहर) अन् बाला रफी शेख सोलापूर जिल्हा यांच्या प्रेक्षणीय व प्रेक्षकांचे लक्ष वेधणाऱ्या लढतीमध्ये बाला शेखने गुणांच्या आधारे अखेर विजय गुटाळवरती विजय संपादन केला. अन्य एका चुरशीच्या सामन्यात कौतुक डफलेला महादेव सलगरकडून गुणांच्या आधारे पराभव सहन करावा लागला.

रुस्तम-ए-हिंद बिराजदार यांचा पुत्र सागरला धाेबीपछाड
गादी विभागात महाराष्ट्र केसरी गटात कोल्हापूर जिल्ह्याचा समीर देसाई व कैलासवासी रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांचा मुलगा सागर बिराजदार (बीड जिल्हा) यांच्यातील लढत चांगलीच रंगली. अगदी अंतिम क्षणापर्यंत या लढतीत उत्कंठा कायम होती. दोन्ही कसलेले मल्ल पूर्ण तयारीसह मैदानात उतरल्यामुळे अगदी सावध पवित्रे टाकत होते. पहिल्या एका मिनिटाला बिराजदारने एकेरी पद काढून समीर देसाईवरती २ गुण मिळवले. लगेच समीरने दुहेरी पद काढून बिराजदारविरुद्ध २ गुणांची कमाई करून बरोबरी साधली. दरम्यान, बिराजदार फारच बचावात्मक खेळ करीत असल्याने पंचांनी त्याला ताकीद देत समीर देसाईच्या पारड्यात एक गुण घातला. तीन मिनिटे संपल्यानंतर पुन्हा लढत सुरू करण्यात आली. त्या वेळी सागर बिराजदार समीर देसाईला हप्ते डाव मारत असतानाच समीरने चपळाईने डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच सालटू डाव मारून त्यास आकाश दाखवले. या लढतीचा प्रेक्षकांनी भरपूर आनंद घेतला

साेलापूरच्या सरोदेला सुवर्ण
सोलापूरच्या वसंत सरोदेने ६५ िकलो माती विभागात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने या वजन गटातील िनर्णायक लढतीत अप्रतिम डाव मारून लातूरच्या विष्णू भोसलेला नमवून सुवर्णपदक पटकावले. सुवर्णपदकासाठीची ही लढत अधिकच रंगतदार झाली. मात्र, यात सरस डाव टाकून वसंताने बाजी मारली. सोलापूरच्या िकरण मानेला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. वास्तविकता या वजन गटात िकरण मानेला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते.

विशाल मानेने मारली बाजी
कोल्हापूरच्या विशाल मानेने ६५ िकलो गादी विभागात गुरुवारी रात्री झालेल्या ब गटातील अंतिम सामन्यात विजयाची नाेंद केली. त्याने अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर शहराच्या अक्षय हिरगुळेला ६-२ गुणांनी धूळ चारून अजिंक्यपद पटकावले. पुण्याच्या सागर लोखंडेने सोलापूरच्या मल्लिकार्जुन खाबनेला चीत करून तृतीय क्रमांक पटकावला.

नवनाथची तानाजीवर मात
औरंगाबादचा नवनाथ औताडेने कांस्यपदकासाठी झालेल्या कुस्तीत साताऱ्याच्या तानाजी वीरकरवर ५-३ ने मात केली. नवनाथने केसरी स्पर्धेत दुसऱ्यांदा कांस्य पटकावले. त्याने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या हाफमध्ये नवनाथने ५-३ गुणांसह आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये ८-६ गुणांच्या आघाडीवर असताना ४.४० व्या मिनिटाला ढाक मारत तानाजीला अस्मान दाखवले. हर्सूल येथील एकता व्यायामशाळेचा नवनाथला राष्ट्रीय प्रशिक्षक मुक्तार पटेल यांचे मार्गदर्शन लाभत अाहे.

गुरूने घेतली माघार; शिष्याला मिळाले सुवर्ण
अापल्या शिष्याला सुवर्णपदकाचा मान मिळावा यासाठी गुरूनेच लढतीत माघार घेतली. त्यातूनच शिष्याला किताबाने गाैरवण्यात अाले. गुरूने राैप्यपदकावर समाधान मानले. गुरूची शिष्यावरील प्रेमाची प्रचिती विभागातील ५७ िकलो वजन गटातील अंतिम लढतीत पाहायला मिळाली. सोलापूरच्या जाेतिबा अरकेलेने लातूरच्या शरद पवारचा गुणांच्या आधारे पाडाव करून बाजी मारली. शरद हे पहिलवानाला सतत प्रोत्साहन देत होते.

डाेपिंग प्रकरणामुळे मल्लांवर वचक, सर्वत्र पसरली शांतता
पहिल्याच िदवशी सकाळच्या सत्रात डोपिंग करताना आयोजन समिती सदस्यांना दोन मल्ल आढळले. त्यांच्याकडून इंजेक्शन व सिरिंज जप्त करून त्यांना स्पर्धेबाहेर करण्यात आले. या प्रकरणामुळे अन्य सर्वच पहिलवानांवर चांगलाच वचक िनर्माण झाला. त्यामुळे खेळाडूंच्या वास्तव्याचे ठिकाण आमदार निवास आणि प्रत्यक्ष स्पर्धास्थळी चांगलीच शांतता होती.
पहिल्या िदवशी उद््घाटन समारंभाच्या वेळी आयोजन समितीचे प्रमुख आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व सहभागी पहिलवानांना शाॅर्टकटचा अवलंब करू नका, तर अगदी मन लावून खेळा. जर कोणी गैरप्रकार करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी ताकीद िदली. या प्रकारामुळे सर्वच आता जागृत झाले असून स्पर्धास्थळी असलेले प्रसाधनगृह अन् इतर सर्व ठिकाणी आयोजन समिती व तांत्रिक समिती सदस्यांच्या नजरा रोखलेल्या असल्यामुळे कोणत्याही पहिलवानाला गैरप्रकार करण्यास जागाच राहिली नाही. दुसऱ्या िदवशी सर्वत्र सावधपणे डोपिंग प्रकरणाचीच चर्चा सुरू होती.

शक्तिवर्धकाची विल्हेवाट
डोपिंगचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोन पहिलवानांना स्पर्धेबाहेर केल्याचे वृत्त हवेसारखे पसरले. त्यानंतर ज्यांनी आपल्यासोबत शक्तिवर्धक औषधे आणि ते घेण्यासाठी साहित्य आणले होते. त्यांनी संबंधितांना फोन करून लगेच ते दूर फेकण्याचे िनर्देश िदले.

चाचणी अनिवार्य व्हावी
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत डाेपिंग चाचणी अनिवार्य व्हावी, अशी मागणी आता जोर धरायला लागली असून जे पहिलवान खरेच वर्षभर परिश्रम घेत तयारी करतात, त्यांच्यावर यामुळे अन्याय होणार नाही, असे मत अनेक माजी कुस्तीपटू व तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.