आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Maharashtra Team Won Most Medals In 19 Years National Modern Pentethalon Competitiom

महाराष्ट्राला सर्वसाधारण जेतेपद; 19 वर्षे शालेय राष्ट्रीय मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमजीएम क्रीडा संकुलात सुरू असलेल्या १९ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या संघाने सर्व पदके पटकावत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, उत्तर प्रदेशच्या संघांनी विजयी आघाडी घेतली. 

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा व राज्य मॉर्डन पेंटॅथलाॅन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  पेंटॅथलॉनमध्ये स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू पुणे क्रीडा प्रबोधनीच्या मानसी मोहितेने वर्चस्व राखत १६.०३.०६ सेकंदांची वेळ देत सुवर्णपदक पटकावले. मुलांमध्ये अजिंक्य बालवडकरने १३.३६.०९ सेकंदांत सुवर्ण आपल्या खात्यात जमा केले. स्पर्धेत यश जाधव (१३.३८.८० से) आणि प्रज्ञा गायकवाडने (१४.११.५४ से) रौप्यपदक, तर मयंक चाफेकर (१६.४१.२५ से) आणि अदिती पाटीलने (१६.५४.९४ से) कांस्यपदक जिंकले. 

स्पर्धेचे उदघाटन एमजीएमच्या संचालिका अपर्णा कक्कड, राकेश नायक, जिल्हा क्रीडाधिकारी ऊर्मिला मोराळे, भारतीय मॉडर्न पेंटॅथलॉनचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, गोकुळ तांदळे, दिनेश वंजारे, नीलेश हरदे, श्याम तळेगावकर यांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...