आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकात्याच्या विजयात चमकला मनिष पांडे, रातोरात बनला होता स्टार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2012 मधील एका IPL पार्टीदरम्यान मॉडेल्ससमवेत मनिष पांडे... तर दुस-या बाजूला दिल्लीवर विजय मिळवल्यानंतर... - Divya Marathi
2012 मधील एका IPL पार्टीदरम्यान मॉडेल्ससमवेत मनिष पांडे... तर दुस-या बाजूला दिल्लीवर विजय मिळवल्यानंतर...
स्पोर्ट्स डेस्क-  कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेयरडेविल्स यांच्यातील मॅचमध्ये 69 धावांची धुव्वांधार खेळी करून कोलकात्याला विजय मिळवून देणारा मनीष पांडे आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. क्रिकेट फॅन्सचा हिरो बनलेल्या मनिषने हा पराक्रम आयपीएलच्या दुस-या हंगामात बंगळुरूकडून खेळताना डेक्कन चार्जर्स टीमविरोधात हा विक्रम केला होता. या मॅचमध्ये मनिषने 73 चेंडूत नाबाद 114 धावांची खेळी केली होती. त्यानंतर तो एका रात्रीत स्टार बनला होता. तेव्हा 19 वर्षाचा होता मनिष पांडे...
 
- मनीष पांडे आता 27 वर्षाचा (10 सप्टेंबर, 1989) आहे. मात्र,  जेव्हा त्याने आयपीएलमध्ये भारताचा खेळाडू म्हणून पहिले शतक ठोकले तेव्हा तो केवळ 19 वर्षाचा होता.
- 2009  IPL मुळे स्टार बनलेल्या मनीष आतापर्यंत भारतीय टीममओध्ये आपले स्थान अद्याप पक्के करू शकलेला नाही हे ही वास्तव आहे. 
- 2014 मध्ये आयपीएल-7 मध्ये त्याने अभिनेता शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवले होते. 
 
शतकानंतर पार्टीत बिझी-

- 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या या जबरदस्त खेळीआधी मनीष पांडेला फारसे कोणी ओळखत नव्हते.
- मात्र, या धमाकेदार शतकानंतर त्याला पार्टीच्या खूप ऑफर येऊ लागल्या. पाहता पाहता मनिष पांडे स्टार बनला होता.
 
शाहरुखच्या टीमला मिळवून दिले होते विजेतेपद-
 
- आयपीएल-7 मध्ये शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन बनली होती.
- तेव्हा शाहरुखसह तमाम क्रिकेट फॅन्सच्या तोंडात फक्त मनिष पांडेचे नाव होते. 
- त्याने फायनल मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग करताना 50 चेंडूत 94 धावा ठोकल्या होत्या.
 
विराटसोबत खेळलाय U-19 वर्ल्ड कप, त्याच्यासारखाच आहे स्टायलिश
 
- 2008 U-19 वर्ल्ड कप जिंकणा-या टीममध्ये मनिष पांडे होता. त्यावेळी कर्णधार विराट कोहली होता.
- विराट आज टीम इंडियाचा कसोटी कर्णधार आहे तर मनिषचे इंटरनॅशनल करियर फारसे नाही.
- आता गुणवान आहे पण त्याला वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीतच भारतीय संघात स्थान दिले गेले आहे. 
- क्रिकेटर सोडून मनिषला एक स्टायलिश इंडियन क्रिकेटर्स म्हणून ओळखले जाते. त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर अनेक फोटोशूट्स आणि पर्सनल लाईफचे स्टायलिश फोटोज पडले आहेत.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मनिष पांडेची हटके लाईफस्टाईल...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...