आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाेज, विकासला अाॅलिम्पिक तिकीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाकू - राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी चॅम्पियन बाॅक्सर मनाेजकुमार व अाशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या विकास कृष्णनने गुरुवारी डबल धमाका उडवला. या दाेन्ही खेळाडूंनी रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला. याशिवाय त्यांनी वर्ल्ड अाॅलिम्पिक पात्रता बाॅक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे त्यांचे पदक निश्चित झाले अाहे.

येत्या ५ अाॅगस्टपासून ब्राझीलमध्ये रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. अाता अाॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे तीन बाॅक्सर नशीब अाजमावणार अाहेत.

मनाेजकुमारने पुरुषांच्या ६४ किलाे वजन गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात ताजिकिस्तानच्या राखिमाेव्ह शावकाडझाेहला ३-० ने धूळ चारली. उपांत्य सामना इंग्लंडच्या पॅट मॅक्राेमॅकशी हाेईल. पॅट हा युराेपियन चॅम्पियन अाहे. भारताच्या विकास कृष्णनने ७५ किलाे वजन गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत काेरियाच्या लीग डाेंग्युगवर मात केली. त्याने ३-० ने सामना जिंकला.
बातम्या आणखी आहेत...