आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाेज उपांत्यपूर्व फेरीत; अमितची विजयी सलामी, 68 वी स्ट्रानडजा मेमाेरियल अांतरराष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेफिया (बुल्गेरिया)- राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी चॅम्पियन मनाेज कुमारसह तीन भारतीय युवा खेळाडूंनी गुरुवारी  ६८ वी स्ट्रानडजा मेमाेरियल अांतरराष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली. अमित फांगल व थाॅमसने विजयी सलामी दिली.
 
सतीश कुमार (९१ किलाे) व मनीष पवारचे (८१ कि.)  अाव्हान झटपट संपुष्टात अाले. मनाेजला ६९ किलाे वजन गटा पहिल्या फेरीमध्ये पुढे चाल (बाय) मिळाली हाेती. त्यानंतर त्याने दुसऱ्या फेरीमध्ये यजमान बुल्गेरियाच्या राॅबर्ट चामासायनचा पराभव केला.  
 
अमित, थाॅमसची दमदार सुरुवात 
 अमितने ४९ किलाे वजन गटाच्या सलामी सामन्यामध्ये अार्मेनियाच्या गास्परचा पराभव केला. अाता त्याचा   सामना कझाकिस्तानच्या एरजान शी हाेईल. थाॅमसने ६४ किलाे वजन गटात बुल्गेरियाच्या एरिनला हरवले.
बातम्या आणखी आहेत...