डलास - इवान कोल (वय 25) नावाचा मिक्स्ड मार्शल ऑर्ट्स (MMA) बॉक्सर रिव्हॉल्व्हरसोबत खेळत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीसाठी मदत करावी, असे आवाहन त्याची पत्नी काइबेर्ली हिने फेसबुकवर केले. तिने लिहिले, 'माझ्या पतीचा मृत्यू झाला. माझ्यावर आमच्या चार वर्षांच्या मुलीची जबाबदारी येऊन पडली. अंत्यविधीसाठीसुद्धा मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे मदत करावी', असे आवाहन तिने केले.
MMA तून केले होते निलंबित...
> कोलची वागणूक ठीक नव्हती. तो खिलाडूवृत्ती खेळत नव्हता.
> त्यामुळे कोल याला बॉक्सिंगमधून निलंबित केले होते. एवढेच नाही तर त्याला 5 हजार डॉलरचा दंडसुद्धा ठोठावला होता.
कोलच्या पत्नीने नेमके काय लिहिले...
> बंदुकीसोबत खेळताना माझ्या पतीचे आज निधन झाले.
> त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आणि त्यांचा मृत्यू झाला.
> तुम्ही माझी मदत केली तर मला चांगले वाटेल.
> माझी आर्थिक स्थिती चांगली नाही. माझ्या पतीच्या अंत्यसंस्काराचा खर्चही मला झेपावणार नाही.
> तुमची मदत मला माझ्या आणि मुलीच्या उदनिर्वाहासाठी उपयुक्त ठरेल, असे तिने लिहिले.
> तिला आतापर्यंत 10 हजार लोकांनी 90 हजार रुपये दिले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...