आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन: सैराट सायना; हरले चायना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- भारताची नंबर वन स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सायनाने फायनलमध्ये चीनची खेळाडू सून यू हिला २-१ ने हरवत किताब जिंकला. या विजयासह सायनाने फायनलमध्ये ७१ मिनिटे संघर्ष सून यू हिला ११-२१, २१-१४, २१-१९ ने हरवले.

पहिला गेम गमावल्यानंतर सायनाने दमदार पुनरागमन करताना बाजी मारली. रिओ ऑलिम्पिकच्या तोंडावर सायनाने शानदार विजय मिळवून आपली दावेदारी सिद्ध केली. या विजयानंतर सायनाला जवळपास ३७.७५ लाख रुपये बक्षीस मिळाले.

हैदराबादच्या २६ वर्षीय सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असलेल्या सूनला १ तास आणि ११ मिनिटांत हरवले. फायनलची लढत अपेक्षेनुसार रोमांचक झाली. लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायनाने दोन वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंना पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. सायनाने थायलंडच्या रत्नाचोक इंतानोनला (२०१३) क्वार्टर फायनलमध्ये तर चीनच्या यिहान वांगला (२०११) सेमीफायनलमध्ये पराभूत केले होते. २०१६ मध्ये सायनाचे हे पहिलेच विजेतेपद ठरले. जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानी असलेल्या सूनविरुद्ध सायनाचा हा मागच्या सात सामन्यांत सहावा विजय ठरला आहे.

पहिल्या गेममध्ये पराभव
जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या सायनाने पहिला गेम ११-२१ ने गमावला. मात्र, या फायनलमध्ये सूनने आक्रमक सुरुवात करताना अवघ्या १८ मिनिटांत सिडनी ऑलिम्पिक पार्कवर पहिल्या गेममध्ये बाजी मारली. सायनाने नेटजवळ काही गुण गमावले. सुरुवातीला दोघी ४-४ ने बरोबरीत होत्या. नंतर सूनने ७-४ ने आघाडी घेतली. तिने ही आघाडी १०-५, ११-६ अशी घेतली. सायनाने संघर्ष करून स्कोअर १७-११ असा केला. यानंतर सूनने सलग गुण मिळवत गेम २१-११ ने जिंकला.

रिआे ऑलिम्पिकसाठी शुभसंकेत
यंदा कामगिरी यथातथा २०१६ या वर्षात सायना इंडिया ओपन सुपर सिरिज, मलेशिया सुपर सिरिज, स्विस ओपन ग्रांप्री, ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप आणि आशियाई चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमध्ये पराभूत झाली.

दुसऱ्यांदा किताब :
हेसायनाचे दुसरे ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद आहे. याआधी तिने २०१४ मध्ये हा किताब पटकावला होता. २०१५ मध्ये ती उपांत्य फेरीत पाेहोचू शकली होती. यंदा तिने चीनचे आव्हान परतवून लावले.

सुन यूवर सहा विजय ऑस्ट्रेलियनओपनच्या अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी खेळाडू सुन यूला सायनाने गेल्या सात लढतींत सहा वेळा पराभूत केलेले आहे. मात्र, या वेळी सायनाला सुनकडून कडवे आव्हान मिळाले.

दोन महिने उरले :
रिओ ऑलिम्पिकला आता केवळ दोन महिन्यांहून कमी वेळ उरला आहे. मात्र, लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायनाने या आशा पल्लवित करणाऱ्या विजयासह शुभसंकेत दिले आहेत.

> सायना तू आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान बाळगण्याच्या संधी मिळवून देत आहेस. वेल डन चॅम्पियन -अमिताभ बच्चन, अभिनेते

> सायना नेहवालला या शानदार विजयानिमित्त हार्दिक शुभेच्छा. अवघ्या देशभराला तुझ्या यशाचा अभिमान आहे. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पुढील स्लाइड्‍सवर वाचा...
>सायनाचे पुनरागमन
>तिसऱ्या गेमचा संघर्ष
>१० लाखांचे बक्षीस
बातम्या आणखी आहेत...