आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणींच्या 'बार'वर महिला जिम्नॅस्टचा संघर्ष, अत्याधुनिक यंत्रसामग्रीची वानवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - मेहनतीच्या बळावर दीपा कर्माकरने अाॅलिम्पिकची पात्रता पूर्ण करून जिम्नॅस्टिकमध्ये एेतिहासिक कामगिरी केली. अशा यशासाठी उत्सुक महाराष्ट्रातील युवा जिम्नॅस्टना अनेक समस्यांचा सामना करावा लागत अाहे. प्रशिक्षक, अत्याधुनिक उपकरणाच्या अभावामुळे निर्माण हाेणाऱ्या अडचणींच्या ‘बार’वर महाराष्ट्रातील प्रतिभावंत ‘दीपा’ संघर्ष करत असल्याचे दिसते.

त्रिपुराची २२ वर्षीय दीपा अाॅलिम्पिकसाठी पात्र झालेली भारताची पहिली महिला जिम्नॅस्ट ठरली अाहे. महाराष्ट्रात यासाठी पाेषक वातावरण असूनही काही तांत्रिक बाबींचा अभाव जाणवताे. त्यामुळे या युवा खेळाडूंना अापल्या प्रतिभेला चालना देण्यासाठी अडचणी येत असल्याचे चिंताजनक चित्र राज्यात अाहे.

केवळ तीन महिला एनअायएस काेच
राज्यात सध्या जिम्नॅस्टिकसाठी अवघ्या तीन महिला एनअायएस प्रशिक्षक असल्याची चिंताजनक बाब अाहे. यात अाैरंगाबाद, पुणे अाणि मुंबईतील महिला प्रशिक्षकांचा समावेश अाहे. राज्यभरात तसे एकूण १५ प्रशिक्षक कार्यरत अाहेेत.

अत्याधुनिक उपकरणांचा अभाव
अांतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी अापली क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महिला खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. त्यांना यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध हाेत नाही. याचाच फटका राज्यातील महिला जिम्नॅस्टना बसत अाहे. त्यांना अापल्या कामगिरीचा दर्जां उंचावण्यात अनेक अडचणींना सामाेरे जावे लागते.

राज्यात अाठ सेंटर
महाराष्ट्रामध्ये सध्या जिम्नॅस्टिकमध्ये करिअर घडवण्यासाठी अनेक प्रतिभावंत खेळाडू उत्सुक अाहेत. मात्र, त्यांना सेंटरच्या अभावाचा फटका बसत अाहे. दर्जेदार अाणि तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या अभावामुळे या युवा खेळाडूंच्या प्रतिभेला चालना मिळत नाही. राज्यात सध्या मुंबई (शहरात चार), पुणे, ठाणे अाणि अाैरंगाबाद येथे जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण देणारी केंद्र अाहेत. महाराष्ट्रात जिम्नॅस्टिकमध्ये गुणवत्तेची कमी नाही. मात्र, त्यांना पुरेसे पाठबळ आणि मदतीची गरज असल्याचे चित्र आहे.
क्रीडा प्रबाेधिनीत अाऊटडेटेड साहित्य !
पुण्यातील क्रीडा प्रबाेधिनीमध्ये जिम्नॅस्टना जुन्या अाणि अाऊटडेटेड साहित्यावर कसरत करावी लागते. अांतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी दर्जा उंचावण्यासाठी उत्सुक असलेल्या येथील जिम्नॅस्टना अडचणींना समाेरे जावे लागत अाहे. दर्जेदार अाणि अत्याधुनिक साहित्याच्या अभावामुळे त्यांना अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावता येत नाही. याचाच फटका त्यांना राष्ट्रीय स्पर्धांमध्ये बसताे. मात्र, तरीही मेहनतीच्या बळावर महाराष्ट्र महिला टीमने दुसरे स्थान गाठले.
प्रतिभेला चालना मिळावी
- महाराष्ट्रामध्ये अनेक दर्जेदार महिला जिम्नॅस्ट अाहे. त्यांच्या प्रतिभेला चालना मिळण्याची गरज अाहे. त्यासाठी पालकांमध्ये जनजागृती व्हावी; जेणेकरून महिला जिम्नॅस्टची संख्या वाढेल. तसेच या सर्व खेळाडूंना याेग्य प्रकारे अत्याधुनिक, दर्जेदार साहित्य व प्रशिक्षणही मिळावे.
- संजीवनी पूर्णपात्रे, जिम्नॅस्टिक प्रशिक्षक