आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या Glamorous गोल्‍फरने केले 30 शार्कसोबत swimming

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शार्क मासा हा समुद्रातील सर्वात धोकादायक जीव आहे, हे सर्वश्रुत आहे. त्‍यामुळेच त्‍याच्‍या जवळ जाणे म्‍हणजेच मृत्‍यूला आंमत्रण देणे आहे. मात्र, एक नव्‍हे दोन तर तब्‍बल 30 शार्क माशांच्‍या कळपात ब्यूटी क्वीन असलेल्‍या मिशेल व्ही या आंतराष्‍ट्रीय गोल्‍फरने बुधवारी स्‍वीमिंग केले.
का केले असे धाडस ?
दुखापतीमुळे त्रस्त असलेली मिशेल व्ही या वर्षी गोल्फ कोर्सवर खास कामगिरी करू शकली नाही. मात्र, "अनोखी शांती' मिळवल्याने ती गेले काही दिवस चर्चेत आहे. तिने बुधवारी हवाईच्या समुद्रात ३० शार्कच्या मध्ये डाइव्ह मारली. तीसुद्धा कोणत्याही सुरक्षा कवचाशिवाय. मिशेलसोबत तिची मैत्रीण आणि मॉडेल मेग एकिम हजर होती.
िट्वट करून व्‍यक्‍त केल्‍या भावना
समुद्रातून परतल्यानंतर या अमेरिकन गोल्फरने िट्वट केले की, "समाधानी आणि शांतिपूर्ण'.#सेवशार्क्ससाठी असे धाडस करणारी मिशेल पुढे म्हणाली, "११०० शार्कला मारण्यात येत आहे. हे एेकून मला खूप दु:ख झाले. हा वेडेपणा आहे. हे थांबवले पाहिजे.'
पुरुष गोल्फरला दिले आव्हान
होनोलुलूत जन्मलेल्या मिशेलने आतापर्यंत ८० आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. यात १४ वेळा तिचा सामना पुरुष खेळाडूंशी झाला. पुरुष गोल्फपटूंना टक्कर देणाऱ्या निवडक महिला खेळाडूंत मिशेल एक आहे. पुरुषांसोबत खेळताना ती किताब जिंकू शकली नाही. मात्र, तिने चार किताब जिंकले.
आई गोल्फर, ब्यूटी क्वीनही
मिशेलचे आई-वडील द. कोरियाचे आहेत. नाेकरीच्या निमित्ताने हवाई येथे स्थायिक झालेले वडील व्ही ब्युंग वुक प्रोफेसर आहेत. आई बो हिने गोल्फसह "मिस कोरिया' स्पर्धेतही सहभाग घेतला आहे. आईकडून खेळ व सौंदर्याचा वारसा घेणाऱ्या मिशेलने वडिलांप्रमाणे कम्युनिकेशन विषयात पदवी घेतली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, मिशेल व्हीच्‍या धाडसाचे धरारक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...